जखमीला तात्काळ उपचारासाठी 50 की.मी.गाठले 45 मिनटात????


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Apr 2024, 8:14 AM
   

मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दीपक सदाफळे यांची अशीही कार्य तत्परता
Akola : आज पवित्र रमजान ईद निमित्त महान वरुन पातुर नंदापुर येथे भेटण्यास जाणारे इम्रान खान जहुर खान रा.बैदपुरा ह.मु.महान वय अं.45 (वर्ष) हे दुचाकीने जात असताना महान पिंजर रोडवरील भेंडगाव नजीक दुपारी अं.4 वाजताच्या दरम्यान अपघात झाल्याची माहीती पिंजर येथील डाॅ.अभिषेक लहाने यांनी मा.से.आ.व्य.फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दीली जखमीच्या कानातुन रक्तस्त्राव होत आहे आणी जखमी बेशुद्ध अवस्थेत असल्याने लवकर येण्यास सांगीतले क्षणाचाही विलंब न करत दीपक सदाफळे यांनी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर दराडे साहेबांना माहीती देऊन दहा मिनटात घटनास्थळ गाठले तेथुन पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले लगेचच येथील वैद्यकीय अधिकारी गोपणारायन मॅडम यांनी पुढील उपचारार्थ अकोला येथे जिल्हा रुग्णालयात रवाना केले लगेचच पथकाच्या रुग्णवाहीकेने दीपक सदाफळे यांनी 45 मिनटात अकोला येथे पोहचुन दीले.घटनास्थळी पिंजर पोलीस टीमसह हजर होते अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.

    Post Views:  116


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व