बोईसर ग्राम पंचायतीकडून अमेय गॅस एजन्सीची प्रशासनाकडे तक्रार
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
22 Jun 2023, 7:59 PM
बोईसर - (संतोष घरत) - अमेय गॅस ऐजन्सी काटकरपाडा,बोईसर हे नागरी वस्तीत असलेल्या गोदामा मध्ये गॅसचा साठा करीत असल्याने नागरीकांच्या जिवितास धोका असल्याने कारवाई करणे बाबत चे पत्र ग्रामपंचायतिने जिल्हा पुरवठा विभाग व तहसीलदार पालघर ह्याना दिनांक-१२/०६/२०२३रोजी दिले आहे.
अमेय गॅस एजन्सी काटकरपाडा बोईसर ता. जि. पालघर यांना ग्रामपंचायत कार्यालयाकडुन जा. नं. ९१६ दि. २३.७. २०१९ रोजी नोटीस बजावलेली होती कि, काटकरपाडा येथील आपले गॅस वितरणाची एजन्सी हि नागरी वस्तीत गॅसचा साठा करीत आहे, त्यावर एजन्सीचे मालक यांनी गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी गोडाऊन बांधण्याचे काम सुरू आहे, गोडाऊन बांधून झाल्यावर गॅस सिलेंडर गोदाम मध्ये ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. असे आश्वासित केले होते.
मात्र सभेने असे निदर्शनास आणुन दिले की, १४ ऑगष्ट २०१९ पासुन दिनांक २२.५. २०२३ हा बांधकामासाठी पुरेसा कालावधी जाउनही आजपर्यंत गोडावून बांधलेले नाही. केवळ गामपंचायतीची दिशाभूल करणेसाठी असे उत्तर दिलेले होते. काटकरपाडा नागरी वस्तीमध्ये गॅसच्या एजन्सी मुळे नागरीकांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे. हया गंभीर बाबीकडे जिल्हा पुरवठा विभाग व तहसीलदार पालघर ह्यांनी त्वरित लक्ष देऊन कडक कारवाई करून सदर एजन्सीचे काम बंद करणे बाबत मासिक सभेत ठराव घेतला असुन त्या प्रमाणे कारवाई करणेस ग्रामपंचायत बोईसरणे विनंती केली आहे .
ह्या गंभिर समस्येकडे बोईसर मंडळ अधिकारी व बोईसर तलाठी ह्यांनी कोणतीही चौकशी सुरू न केल्यामुळे त्यांच्यावरती जनता संशय व्यक्त करीत असल्याची कुजबूज ऐकण्यास मिळत आहे .
आता हे बघणे महत्त्वाचे ठरेल की जनतेच्या जीविताशी खेळणाऱ्या गॅस एजन्सी मालकावर कारवाई होते. की नेहमी प्रमाणे बंद लिफाफा देऊन प्रकरण दडपले जाते की काय? असा प्रश्न जनतेला भेडसावत आहे.
Post Views: 136