बोईसर ग्रामपंचायतीमध्ये निलम संखे अविरोध


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Oct 2022, 8:25 AM
   

पालघर (श्री. संतोष घरत) - राज्यात काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका  जाहीर होऊन आज माघार घेण्याची तारीख असल्याने तहसीलदार कार्यालयाच्या पटांगणात प्रचंड गर्दी जमली होती.

  सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाणारी म्हणजे बोईसर ग्रामपंचायत. ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता थेट सरपंचाकरिता 10 नामनिर्देशन फॉर्म भरण्यात आले असून सदस्या  करिता 81 फॉर्म दाखल करण्यात आले होते. आज माघार घेण्याची तारीख असल्याने थेट सरपंचातील सात सदस्यांनी माघार घेऊन तीन सदस्य थेट सरपंचाकरिता रिंगणात उभे असून, वैद्य राहिलेले सदस्य  एकमेकांसमोर उभे असल्याचे दिसून आले. त्यांच्यामध्ये मोठी चुरस होईल अशी शंका मतदाराकडून व्यक्त केली जात आहे.   शिवसेना जिल्हाप्रमुख व बोईसर चे किंगमेकर समजले जाणारे श्री निलम संखे ह्यांची बोईसर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत  बिनविरोध निवड झाल्याने सर्वकडे आश्चर्य व्यक्त केले जात असून त्यांच्यावर अभिनंदननाचा वर्षाव होत असल्याचे समाज माध्यमाच्या द्वारे निदर्शनास आले. त्यांनी केलेल्या कार्याची पोच पावती  म्हणून आज त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याची चर्चा सर्व कडे होत आहे.

    Post Views:  312


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व