आजऱ्याच्या जयश्रीने खेचून आणला विजयश्री


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  16 Apr 2022, 4:45 PM
   

आजरा : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आजऱ्याची कन्या असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी दणदणीत विजयी मिळवला. जयश्री जाधव यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी कायम राखत विजयश्री खेचून आणला. यानंतर कार्यकर्त्यांनी विजयी गुलाल उधळायला सुरुवात केली. जयश्री जाधव या आजरा गावच्या असल्याने याठिकाणीही मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत जयश्री जाधव या विक्रमी मतांनी निवडून आल्या. माजी आमदार वसंतराव देसाई यांच्या नंतर जयश्री जाधव या आमदार झाल्या आहेत. जयश्री जाधव यांच्या विजयानंतर आजऱ्यात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

प्रचारासाठी मित्रपरिवार व नातेवाईकांचा कोल्हापुरात ठाण

जयश्री जाधव या डॉ. शंकरराव मोरे यांची कन्या व संतोष मोरे यांची बहीण आहेत. जोशी गल्लीमध्ये त्याचे वास्तव्य होते. बारावीनंतर त्यांचा चंद्रकांत जाधव यांच्याशी विवाह झाला. सध्या त्यांची माहेरची मंडळी सोमवार पेठेत वास्तव्यास आहेत. निवडणुकीत आजऱ्यातील टीम सतेज, राष्ट्रवादी, शिवसेना कार्यकर्ते, मित्रपरिवार व नातेवाईक प्रचारासाठी कोल्हापुरात ठाण मांडून होते. जयश्रींची विजयश्री खेचून आणणेसाठी आजरेकरांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. उत्तर मतदारसंघात असणारे पाहुणे, मित्रमंडळी यांचेशी भेटून प्रचारात आजरेकरांनी प्रचारात आघाडी घेतली होती.

विजयाची घोषणा होताच आतषबाजी

जयश्री जाधव यांच्या विजयाची घोषणा होताच संभाजी चौक, शिवाजी पुतळा, भगवा चौकात फटाक्यांची आतषबाजी करणेत आली. यावेळी जि.प‌.उपाध्यक्ष जयवंत शिंपी, नगरसेवक किरण कांबळे, अभिषेक शिंपी, कारखान्याचे माजी संचालक आनंदा कुंभार, अमित खेडेकर यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

    Post Views:  252


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व