खेंडकर ज्ञानगंगा मधे विद्येची देवता क्रांतीज्योती सावीत्रिबाई फुले जयंती


 संजय देशमुख  04 Jan 2022, 11:19 AM
   

अकोला : स्थानीक  सरस्वती नगर, जुना वशीम बायपास, अकोला येथील विष्णुपंत  खेंडकर विद्यालय, स्व. यमुनाबाई खेंडकर म. प्रा. शाळा, व स्व. नारायणराव खेंडकर काँव्हेंट येथे आज तुर्तास कोरोना संकटाचे सावट असल्यामुळे शालेय शिक्षक व कर्मचारी उपस्थित होऊन विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावीबाई फुले यांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यात आले. खेंडकर विद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. अध्यक्षस्थानी विष्णुपंत खेंडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. निलेश खेंडकर उपस्थीत होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्व. यमुनाबाई खेंडकर प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक व महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष मा. अल्केश खेंडकर यांची प्राथनीय उपस्थीती होती. यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीयोती सार्वत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पन करुण उपस्थितांनी अभिवादन केले तसेच अध्यक्षंनी आपल्या भाषणातून क्रांतीज्योती सार्वत्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना भारतात त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय बालिका दिवस भ्हणून साजरा केला जातो. पुणे येथील बुधवार पेठ भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. आणि त्याचा लाभ आज भारतातील संपुर्ण मुलीं घेत आहेत, त्यामुळे देशात आज सर्वच क्षेत्रात स्त्रीया प्रार्थनीय दिसत आहेत व देशाच्या विकासाला चालना मिळत आहे. असे मत व्यक्त करून विद्यार्थांना प्रोत्साहन दिले. याप्रसंगी शाळेतील शिक्षीका उशा ऊबाळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन केले . या वेळी शाळेतील सर्व शिक्षक आशा काळे, कांचन शिरसाट, सुरेश सुरत्ने, प्रा. प्रज्ञानंद थोरात, श्रीकांत पागृत, गोपाल वानखडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशास्वीतेसाठी शाळेतील इतर शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

    Post Views:  244


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व