लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण विभागीय संघटकपदावर ज्येष्ठ पत्रकार पंकज राऊत


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  30 May 2022, 2:01 PM
   

अकोला ः लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या कोकण विभागाच्या संघटन तथा संपर्कप्रमुख पदावर दै. लोकमत मुंबई आवृत्तीचे ज्येष्ठ पत्रकार पंकज राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
श्री. पंकज राऊत हे गेल्या 25 वर्षापासून दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे कोकण विभागात काम करीत आहेत. सध्या ते पालघर, बोईसर, डहाणू परिसरात औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात पत्रकारीतेमध्ये सक्रिय आहेत. यापूर्वी त्यांनी दै. तरुण भारतमधूनही आपल्या अभ्यासू पत्रकारीतेचा सक्रिय ठसा उमटविलेला असून कोकण विभागात सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्येही ते क्रियाशील आहेत. 
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची भेदातीत व पारदर्शक वाटचाल आणि नाविण्यपूर्ण सातत्त्याच्या उपक्रमांमुळे त्यांनी या पत्रकार महासंघाचे सभासदत्व स्विकारले असून त्यांचा कोकण विभागातील प्रभाव पाहता लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्टीय-अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी त्यांची कोकण विभागाच्या संघटन तथा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. याबाबत मनोगत व्यक्त करताना श्री. पंकज राऊत यांनी कोकण विभागात संघटन मजबूत करून महासंघाची नाविण्यापूर्ण बांधणी करण्याचे अभिवचन दिले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व त्यांच्या कोकणातील स्नेही हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे. 

    Post Views:  252


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व