प्रवीण बोपुलकर यांच्या वाळन कथेचा संत गाडेगाबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
05 Mar 2026, 8:25 AM
अकोला : जिल्ह्यातील खेट्री (ता. पातूर ) येथील श्री. प्रवीण जगन्नाथ बोपुलकर यांच्या साहित्यिक कार्याला मानाचा सन्मान मिळाला असून त्यांच्या गाजलेल्या वाळन कथेचा या बी. ए. भाग-२(सत्र ४) साठी नेमलेल्या मराठी साहित्य या विषयाच्या अभ्यासक्रमासाठी राघव पब्लिकेशन द्वारा प्रकाशित वैदर्भीय कथा या डॉ. गणेश मालटे, डॉ. गजानन मुंदे, डॉ. राजेश मिरगे संपादित या पुस्तकाचा संत गाडेगाबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून या ग्रंथास सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. माधव पुटवाड यांची प्रस्तावना लाभली आहे.
ग्रामीण जीवनाचे वास्तव, मानवी नातेसंबंधातील सूक्ष्म भावविश्व, सामाजिक जाणिवा आणि जीवनातील विविध वळणांचे संवेदनशील चित्रण करणाऱ्या वाळन कथासंग्रहाने वाचक व समीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते.
प्रवीण बोपुलकर हे प्रशासकीय सेवेसोबत सातत्याने साहित्य साधना करणारे साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या साहित्यसंपदेमध्ये अवतरण चिन्ह हा कविता संग्रह व वाळन या कथासंग्रहाचा समावेश आहे. ते सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल या साहित्यिक संस्थेचे संस्थापक असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत संस्थेच्या शाखांमार्फत साहित्यिक उपक्रम राबविले जात आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांसह विविध राज्यस्तरीय साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित कवी व गझलकार म्हणून सहभाग नोंदवत त्यांनी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार व सन्मान प्राप्त केले आहेत. संत गाडेगाबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात वाळनचा समावेश हा त्यांच्या साहित्यिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून या कथासंग्रहामध्ये ज्येष्ठ साहित्यिक उद्धव शेळके, भाऊ मांडवकर, नामदेव कांबळे, बाबाराव मुसळे, प्रतिमा इंगोले, पुरुषोत्तम बोरकर, सतीश तराळ, सदानंद देशमुख, अशोक मानकर,एकनाथ तट्टे यांसारख्या मातब्बर कथाकारांबरोबर प्रवीण बोपुलकर यांना स्थान मिळाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 34