सातारा: माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकरांना साता-याचा (Satara) पुढचा खासदार करा, अशी मागणी विक्रम पावसकरांच्यावतीनं करण्यात आली. या मागणीने खासदार उदयनराजे भोसले (Udaynraje Bhonsle) यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. नगरपंचायत निवडणुकांच्या निमीत्ताने सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. मंगळवारी फलटण तालुका भाजप (BJP) संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं यावेळी बरीच राजकीय बँटींग झाल्याचं पाहायला मिळालं.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात भाजप चे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे पुढच्यावेळी साता-याचे खासदार व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करुन दाखवली. हे विधान खूप मोठ मानलं जातय कारण साता-याचे आत्ताचे खासदार राष्ट्रवादी श्रीनिवास पाटील असले तरी त्यांच्या विरोधात उदयनराजे भोसले यांनी भाजपातून निवडणूक लढविली होती. उदयनराजेंचा या ठिकाणी मोठा पराभव झाला होता.
उदयनराजे भोसले हे आत्ता भाजपाचे राज्यसभेचे खासदार आहेत, असं असताना पावसकरांनी केलेल्या या विधानाला एक वेगळं महत्व प्राप्त झालय. भाजपात सगळं अलबेल चाललेय असं काही नसल्याचं, या विधाना वरुन दिसतेय.
सातारा जिल्हा भाजपाला आता उदयनराजे नकोत का असा सवाल आता अनेकांना पडलाय. राष्ट्रवादी मधून खासदार झालेल्या उदयनराजेंनी भाजपातील काही नेत्यांच्या आग्रहास्तव स्वत:ची खासदारकी सोडून अगदी सहा महिन्या दुस-यांदा निवडणूक लढविली. भाजपाच्या आग्रहा खातर हातातली सत्ता सोडून भाजपवासी झालेल्या उदयनराजेंना भाजपातीलच लोक आता डावलायला लागल्याचं चित्र आहे. पुढील लोकसभेच्या निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीची मागणी करुन भाजपा जिल्हाध्यक्षांनी एका वेगळ्याच वादाला तोंड फोडलंय ही मागणी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांकडे केलीये यामुळे याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातय.
Post Views: 234
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay