संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ वाणिज्य अभ्यासक्रम पुस्तक विमोचन कार्यक्रम संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 May 2025, 8:57 AM
   

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील च्या वाणिज्य व व्यवस्थापन  विभाग द्वारा National Education Policy  अंतर्गत GOEC चे अत्यंत महत्वपुर्ण विषय Introduction To Accounting या विषयाचे पुस्तक (प्रकाशक: प्रशांत पब्लिकेशनस् जळगाव) आज दिनांक 9/5/2025 रोजी साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा जि.वाशिम चे सन्माननिय प्राचार्य डाॅ.देवेंद्रजी गावंडे सर यांच्या शुभहस्ते सदर पुस्तकाचे विमोचन एका छोट्याखानी कार्यक्रमात करण्यात आले ,याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन लेखिका प्रा.डाॅ.सौ.जया भगत मॅडम, प्रा.डाॅ.अनिल तिरकर, प्रा.डाॅ.सुनील बोरचाटे,  प्रा.डाॅ.सचिन कडु, प्रा.डाॅ.वासुदेव गोलाईत व साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी व वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
प्रमुख अतिथी प्रा.डाॅ.अनिल तिरकर यांनी NEP मधे GOEC चे विषय विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानवृद्धीमध्ये किती महत्वाचे आहे हे आपल्या उद् बोधनात विद्यार्थ्यांना समजावुन सांगितले. प्रा.डाॅ.वासुदेव गोलाईत यांनी NEP हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासात किती महत्वाचे आहे हे उपस्थित विद्यार्थ्यांना समजावुन सांगितले.  प्राचार्य डाॅ.देवेंद्रजी गावंडे यांनी आपल्या अध्यक्षणीय भाषणात सदर पुस्तकाची प्रशंसा केली व सदर पुस्तक  सिलॅबसनुसार अतिशय आवश्यक होते याबद्दल लेखिका प्रा.जया भगत(श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालय,वनोजा), प्रा.डाॅ.ज्योती माहेश्वरी (हेडा)(श्रीमतील.रा.तो.महाविद्यालय,अकोला) व प्रा.राधिका अंभोरे(एम.ई.एस.काॅलेज,मेहकर) या सर्वांचे कौतुक व अभिनंदन केले व पुढेसुद्धा आपण अशीच महत्वपुर्ण पुस्तके वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध करुन द्यावे अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.डाॅ. सुनिल बोरचाटे व  प्रा.डाॅ.सचिन कडु यांनी उपस्थितांचे आभार मानले.

    Post Views:  50


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व