मुंबई -अहमदाबाद मार्गालगत असलेल्या हॉटेल मनोर इन वर प्रशासन मेहेरबान


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  18 Oct 2023, 6:29 PM
   

मनोर - (संतोष घरत) - नांदगाव तर्फे मनोर येथील सर्व्हे नं.७२ मधील १० ते १२ गुंठ्यात बांधण्यात आलेल्या सियाब पटेल हे चालवीत असलेले हॉटेल मनोर इन  यामध्ये कोणती कायदेशीर परवानगी न घेता हॉटेल व्यवसाय करीत असल्यामुळे महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
 मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत असलेला मनोर इन हॉटेल जवळ बेकायदेशीर हॉटेल चालवताना दिसत आहे.परंतु याकडे महसूल विभागाने चहा पाणी घेतली आहे का? अशी खमंग चर्चा होताना दिसत आहे.कारण माहित असून सुद्धा याकडे कानाडोळा करताना आढळत आहे. गरिबांचे हॉटेल तोडताना महसूल खाता पुढे असतो तर माजलेले हॉटेल मालकांवर महसूल का कारवाई करत नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.सदर जागेच्या व्यवहारात सुध्दा वर खाली व्यवहार झाल्याचा दिसून येत आहे. ह्या ठिकाणची जागा आदिवासी खातेदार सुदाम बारक्या धापशी व सियाब अखलाक पटेल ह्यांनी (१)ठकु दुद्या जाधव (२) मंजुळा कान्हा मानकर (३)प्रवीण कान्हा मानकर (४) प्रकाश कान्हा मानकर (५) सुंदर रामू साबळा (६) तारा सुनील वांगडा (७) कृष्णा कान्हा मानकर ह्या कडून नोटरी कराराने तथाकथित विकत घेतल्याचे दिसून येत आहे. परंतु या व्यवहाराला  खरेदीखताचे नाव दिलेले असून दि.२४/११/२०१२ रोजी नोटरी केलेल्या असून आज पर्यंत मिळकत विकत घेतल्या बाबत मूळ मालकाशी काहीही कागदोपत्री व्यवहार केलेला नाही.महामार्गावर ७४ गुंठे जागा केवळ ,६,००,०००/ रुपये इतक्या कमी किंमतीस विकत देण्याबाबत मजकूर आहे.परंतु त्यापैकी १,५०,०००/रूपये इतकी रक्कम धनादेश्याने  दिल्याबाबत उल्लेख आहे. 
यामध्ये विक्री परवानगी न आणता शासनाचा कर बुडविण्याकरिता ७५% दंड न भरता तथाकथित खरेदीखत केलेले आहे.तसेच मनोर इन हॉटेल महामार्ग लगत असल्यामुळे महामार्गाची रीतसर परवानगी सुध्दा घेण्यात आलेली नाही. हॉटेलमध्ये बेकायदेशीर अवैध दारू विक्री जोमात सुरू असून अशा दारू विक्रीला आशीर्वाद नेमका कोणाचा आहे. अशी चर्चा  सर्वत्र सुरू आहे स्थानिक पोलिसांची उदासीनता आणि राज्य उत्पादन खात्याच्या दुर्लक्षामुळे महामार्गावर अवैध दारू विक्रीत सर्रास वाढ होत आहे. हॉटेल ने भाड्याने दिलेल्या दुकानामध्ये सरास गुटखा मिळत असल्याने त्या ठिकाणी गर्दुल्ल्याचीही बरीच गर्दी असते. त्याच प्रमाणे महामार्गावरील मनोर इन हॉटेलमध्ये देशी-विदेशी दारू सहज मिळत असल्याने हॉटेल मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो.

    Post Views:  153


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व