चिखलीत अवैध दारू साठ्यावर छापा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  31 Jan 2023, 3:09 PM
   

चिखली -  पोलीस स्टेशन चिखली येथे आज दिनांक 31 .01.2023  रोजी पोलिस निरीक्षक श्री विलास पाटील , ठाणेदार पोलीस स्टेशन चिखली यांचे मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोहेका निवृत्ती चेके ,पोलीस अमलदार उमेश राजपूत ,शिवानंद तांबेकर, सुनील राजपूत ,निलेश सावळे राहुल पायघन, रामेश्वर भांडेकर , मनीषा मोरे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये अवैध दारू विक्रेता अनुरथ ओंकार भंडारे वय 65 वर्ष राहणार किनोळा तालुका चिखली याचे राहते घरी छापा मारला  असता सदर इसमाचे
 राहते घरामध्ये पाठीमागील खोलीमध्ये पलंगाखाली लपून ठेवलेले तीन कागदी पुठ्ठ्याचे बॉक्समध्ये देशी दारू संत्रा 999 कंपनीच्या प्रत्येकी 90 मिलीच्या 300 नग शिश्या  किमती अंदाजे 10500/-रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करून त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोहेका निवृत्ती चेके व त्यांचे पथक करत आहे.

    Post Views:  172


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व