१३ मार्च ला महिला साहित्य संमेलनाचे आयोजन मातृशक्ती गौरव पुरस्कार, परिसंवाद , कविसंमेलन, गझल मुशायरासह विविध कार्यक्रमात राज्यभरातील नामवंत महिला साहित्यिकांचा समावेश,


 संजय देशमुख  2022-03-10
   

अकोला ( दिनांक ११ मार्च) :
सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था अकोला आणि मराठी विभाग शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राज्यस्तरीय महिला मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पद्मश्री सिंधुताई सपकाळ साहित्यनगरी स्व. भाऊसाहेब गोडबोले सभागृह शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय येथे रविवार दिनांक 13 मार्च 2022 रोजी करण्यात आले आहे. महिला साहित्य संमेलनाला संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शोभा रोकडे (अमरावती) लाभल्या आहेत. साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. स्मिता निखिल दातार (मुंबई) हजेरी लावणार आहेत तर सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुनिता सुभाष मेटांगे स्वागताध्यक्ष पदाची तर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. तारा हातवळणे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडणार आहेत. संमेलनाच्या मुख्य उद्घाटन सोहळ्याला महापौर अर्चना मसने, डॉ. कौमुदिनी बर्डे-क्षीरसागर, डॉ. मंदा नांदूरकर (अमरावती), सीमा शिवाजीराव शिंदे (सोलापूर), आणि प्रा. प्रतिभा सोनार (नाशिक) यांची प्रमुख उपस्थिती आहे. प्रास्ताविक कु. सृष्टी संतोष इंगळे करणार आहेत. उद्घाटन सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रा. डिंपल मापारी आणि प्रा. राजकन्या खणखणे करणार आहेत. 
शब्दसृष्टी संमेलन विशेषांक अतिथी संपादक- डॉ. स्वाती पोटे (ज्येष्ठ साहित्यिक) मूर्तीजापूर तसेच मंगलम  कविता संग्रह कवयित्री अॅड. मंगलाताई नागरे चे प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे


मातृशक्ती गौरव पुरस्कार

महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव विविध पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे यात प्रामुख्याने प्रा. डॉ. निलिमा लखाडे (सरप)- राजमाता जिजाऊ पुरस्कार, डॉ. स्वप्ना लांडे-सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार, अंशुला अशोकराव सरोदे-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, देवकाताई देशमुख-इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार, मीराताई ठाकरे - बहिणाबाई चौधरी काव्यगौरव पुरस्कार, शीलाताई राजपुत -सुषमा स्वराज नारीरत्न पुरस्कार, सुमित्राताई काशिनाथ वानखडे- रमाई जीवन गौरव पुरस्कार, नयनाताई पोहेकर-स्व. उषाताई घुगे समाजकार्य पुरस्कार, ज्योतीताई देशमुख- वीरस्त्री लताताई देशमुख स्वामिनी पुरस्कार, विद्याताई राणे -मदर टेरेसा समाजकार्य पुरस्कार यांचा समावेश आहे.

परिसंवाद
 मुलीचे लग्नाचे वय २१ वर्षे-योग्य/अयोग्य? या विषयावर अॅड. अर्चना गावंडे (जेष्ठ विधिज्ञ) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख अतिथी :- अॅड. रजनी बावस्कर (सरकारी वकील, बुलडाणा) यांच्या उपस्थितीत परिसंवाद सत्राचे आयोजन केले आहे. वक्त्यांमध्ये ज्योती धंदर (महिला तक्रार निवारण केंद्र, खामगाव ग्रामीण पो.स्टे.), डॉ. सुलभा ठक, अॅड. विशाखा बोरकर आणि अॅड. आम्रपाली गोपनारायण यांचा समावेश राहणार आहे. परिसंवाद सत्राचे सूत्रसंचालन लता बहाकर तर आभार प्रदर्शन मालती राठोड करतील. 

गझल मुशायरा
गझल मुशायरा जेष्ठ गझलकार सुनंदा पाटील ( मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली तर चित्रा कहाते (नागपूर), देवकाताई देशमुख (अकोला), डॉ. मीना सोसे (लोणार), प्रा. विजयालक्ष्मी वानखडे (बुलडाणा), धनश्री पाटील (नागपूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगणार आहे. मुशायऱ्याला डॉ. स्वाती पोटे, सुनिता इंगळे (मुर्तीजापूर), रोहिणी पांडे (नांदेड), निर्मला सोनी (अमरावती), दिपाली सुशांत (वाशीम), लीना साकरकर, उज्वला इंगळे (कारंजा), अनुराधा दाणी, अश्विनी बोंडे (अकोट), काव्या शिरभाते (यवतमाळ), आणि अलका देशमुख (अमरावती) या महिला गझलकारांचा समावेश आहे. मुशायऱ्याचे निवेदन निशा डांगे ( पुसद) आणि प्रियंका गिरी (दर्यापूर) करणार आहेत…

 ★ कविसंमेलन

कवी संमेलनाला प्रा. विजया मारोतकर (नागपूर) अध्यक्ष म्हणून लाभल्या आहेत. कविसंमेलनाला नेहा भांडारकर (नागपूर), कविता राठोड (अकोला), वनिता गावंडे (अकोला), मीराताई ठाकरे (अकोला), संघमित्रा खंडारे (दर्यापूर), अलका बोर्ड (अकोला) आणि मधुराणी बनसोड (वाशिम) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सहभागी कवयित्रीमध्ये प्रांजली काळबेंडे (मुंबई), साधना काळपांडे (अकोट), प्रा. वर्षा कावरे (मुर्तीजापूर), प्राची मोहोड (शेगाव), प्रियंका वाडेकर, श्रावणी टेकाडे (अकोला), योगिता वानखडे, विमल सरोदे (मुर्तिजापूर), उमा गवई, सीता भगत (अकोला), रीना दुधे, अनिता देशमुख (अकोट), मंगला रडके, मिना नानवटकर (परभणी), सविता काळे, भारती सावंत (मुंबई), अलका माईनकर, प्रतिभा शिरमाते (अकोला) यांचा समावेश आहे. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन  वृषाली देवकर (परतवाडा)आणि राधिका देशपांडे (शेगांव) करणार आहेत. 

समारोपीय सत्र

साहित्य संमेलनाचा समारोप डॉ. सूचिता पाटेकर शिक्षणाधिकारी (माध्य) अकोला यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. समारोपीय सत्राला प्रा. शोभाताई रोकडे संमेलनाध्यक्ष, डॉ. स्मिता देशमुख (प्राचार्य, विमलताई देशमुख महा. वि. अमरावती); राजश्री कौलखेडे, (महिला व बालकल्याण अधिकारी, अमरावती), ऍड. रत्ना चांडक (प्राचार्य अकोला विधी महाविद्यालय), प्रा. डॉ. अनघा सोनखासकर (अकोट), रसिका रमेश वाजगे (मुख्याध्यापक मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालय), विद्या बनाकर ( सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका राज्य पुरस्कार प्राप्त) आणि सौ. दिपाली किशोर बळी (शिक्षिका) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. समारोपीय सत्राचे सूत्रसंचालन मीना कवडे तर आभार प्रदर्शन मालती राठोड करणार आहेत. 

गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव

साहित्य संमेलनामध्ये कु. नेहा चक्रधर राऊत (सामाजिक /शैक्षणिक /राजकीय), कु. संध्या संजय शिंदे (ऑल इंडिया बेस बॉल आंतरविद्यापीठ, सुवर्ण पदक), कु. अवंती अरविंद शिंगाडे (शिष्यवृत्ती परीक्षेत विदर्भातून प्रथम), कु. निकीता अग्रवाल (राष्ट्रीय खेळाडू टेबल टेनिस), कु. श्रुती डाहेलकर (आट्यापाट्या, गोल्ड मेडालिस्ट (राष्ट्रीय खेळाडू) कु. भाग्यश्री संतोष इंगळे (चित्रकला/ रांगोळी /मेहंदी/ आर्ट अँन्ड क्राफ्ट) यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. 
संमेलनाला जास्तीत जास्त साहित्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. साबू ,  डॉ. प्रा. शिवाजी नागरे (मराठी विभाग प्रमुख), प्रा. डॉ. श्रीकृष्ण काकडे, संतोष इंगळे (अध्यक्ष, सृष्टि बहुद्देशिय युवा संस्था), निलेश कवडे (उपाध्यक्ष अ. भा. वन्हाडी साहित्य मंच) संमेलन मुख्य आयोजन समितीचे सदस्य पुष्पराज गावंडे (सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई) प्रा. सदाशिव शेळके (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल) डॉ. मनोहर घुगे (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त) यांच्यासह स्वागत समितीचे निखिल बोरीकर, सारंग करे, वंदना साळवे, प्रा. वर्षा कावरे, राजेश कटोले, दिनेश सातव, सूर्यकांत शास्त्री, मिलींद इंगळे, शिवाजी पाटील, मनोहर नागे, सुनिता इंगळे, सोनाली मोहोड, गजानन घोंगे, उषाताई भोपळे, डॉ. सुनिता खारोडे, अनिल डाहेलकर, मालती राठोड, कल्पना कानडे, मिरा इंगळे, संध्या डाहेलकर, भारती इंगळे यांनी केले आहे.
महिला साहित्य संमेलनाच्या पत्रकार परिषदेला  डॉ. प्रा. शिवाजी नागरे (मराठी विभाग प्रमुख), प्रा. डॉ. श्रीकृष्ण काकडे, संतोष इंगळे (अध्यक्ष, सृष्टि बहुद्देशिय युवा संस्था), निलेश कवडे (उपाध्यक्ष अ. भा. वन्हाडी साहित्य मंच) संमेलन मुख्य आयोजन समितीचे सदस्य पुष्पराज गावंडे (सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई) प्रा. सदाशिव शेळके (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल) डॉ. मनोहर घुगे (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त) यांची उपस्थिती होती.

    Post Views:  474


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व