व्यापारी संकुलाचा एक मजला अनधिकृत चौकशी व्हावी
गाळे विकून मालक आणि महसूल विभाग मालामाल
सिव्हिल लाईन रोड वरील नसुल शिट क्र ५३/प्लॉट न ९/१० या ठिकाणी साधरण तीस वर्षा आधी उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचां वरचा संपूर्ण मजला अनधिकृत आणि बिना नकाशा मंजूर न करता बांधलेला आहे.
बक्षीस पत्र स्वरूपात प्राप्त झालेल्या जागेवर तीस वर्षापेक्षा अधिक काळापूर्वी व्यावसायिक प्रतिष्ठान बांधण्यात आले. या व्यावसायिक प्रतिष्ठानच्या फक्त खालच्याच जागा बांधण्याचा नकाशा मंजूर असून वरच्या संपूर्ण पहिला मजल्याचे बांधकाम म न पा ची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधण्यात आला आहे. सदर प्रकार एव्हढ्यावरच न थांबता मालकाने सदर व्यापारी संकुलातील दुकानांचे गाळे अनेक वेळा अनेकांना विकून व म न पा ला अंधारात ठेऊन स्वतः पैसा कमवून मोकळा झाला. याही पेक्षा कहर म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या व नकाशा मंजुरच नसलेल्या या व्यावसायिक प्रतिष्ठानच्या गाळ्यांचे महसूल विभागाने फेर फार , नमुना ड व गाळे विक्रीची सुद्धा परवानगी वारंवार दिली आहे. हे बिना भ्रष्टाचाराचे घडले काय ?
दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे जर सदर मालमत्तेतील दुकानांचे नकाशेच अस्तित्वात नाही तर विना परीक्षणाचे जागेचे कर मूल्यांकन कोणत्या तत्वावर करण्यात आले आणि कोणी केले.? याचा सरळ अर्थ असा आहे की कर्मचाऱ्यांनी अर्थपूर्ण तत्वावर अंदाजे कर लागू करून व्यवहार व म न पा मधे सदर मालमत्तेची नोंद करून घेतली. नव नियुक्त आयुक्तांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सदर मालमत्तेची प्रत्यक्ष पाहणी करावी .त्याच प्रमाणे सदर मालमत्ता अस्तित्वात आल्यापासून महसूल विभागाच्या माध्यमातून झालेल्या खरेदी विक्री ची शहानिशा करून जागा मालकाकडून बाजारभावा प्रमाणे व चक्रवाढ व्याजाने सदर मालमत्ता मालकाकडून दंड आकारून,तसेच शासनाची दिशाभूल करून शासनाची व ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल करावे. गरज पडल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी एक विभागीय समिती नेमून शहानिशा करून निःपक्षपणे कार्यवाही करून आपल्या कार्यप्रणालीचा पुरावा द्यावा. जेणे करून बांधकाम क्षेत्रातील इतर बिल्डरांना तसेच अनधिकृत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसेल.
Post Views: 79