शिक्षण विभाग योजना जिल्हा परिषद अकोला येथील सहायक योजना अधिकारी प्रमोद टेकाडे यांची पदोन्नतीने उपशिक्षणाधिकारी या पदावर शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद अकोला येथे नियुक्ती झाली आहे. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 24 सप्टेंबर 2025 नुसार त्यांना उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला येथे पद स्थापना देण्यात आली असून एक अभ्यासू तसेच सर्वांना नेहमी सहकार्य करणारे अधिकारी अशी प्रमोद टेकाडे यांची ख्याती असून त्यांनी शिक्षणाधिकारी मनपा अकोला, प्रशासन अधिकारी नगर परिषद मूर्तिजापूर, दर्यापूर, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, अकोट इत्यादी नगर परिषदेचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळला आहे. शिक्षण विभाग माध्यमिक येथे जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक व सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक या पदाचा कार्यभार देखील त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला आहे. शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद अकोला येथील उपशिक्षणाधिकारी हे पद गेल्या सात ते आठ वर्षांपासून रिक्त होते एक अभ्यासू व कर्तव्य तत्पर अधिकारी मिळाल्याने शिक्षण विभाग माध्यमिकचे कामकाज निश्चितच गतिमान होईल अशी सर्वांना अपेक्षा आहे. प्रमोद टेकाडे यांची उपशिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटना व अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 63