मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचे हस्ते चिंचोली गणू शाळेत वृक्षारोपण
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
27 Jul 2022, 4:49 PM
अकोला- जि.प.शाळा, चिंचोली गणु येथे अकोला जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी श्री सौरभ कटीयार यांनी नुकतीच भेट दिली.यावेळी शाळेच्या आवारात त्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या भेटी दरम्यान त्यांनी सेतु अभ्यासक्रम पूर्वचाचणी पेपर,अभ्यासक्रम अंमलबजावणी, वार्षिक नियोजन घटक नियोजन दैनिक टाचण, शिकस्त वर्गखोल्याबाबत चर्चा, , विदयार्थी गुणवत्ता ,jolly phonics method reading ,मिशन झिरो ड्राॅप आऊट ,वृक्षारोपण,शालेय रंगरंगोटी,वर्ग सजावट, डिजीटल साहित्त्य, शैक्षणिक साहित्य वापर,शालेय स्वच्छता या बाबींची ची पाहणी केली. वर्ग १ व २ च्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी गटविकास अधिकारी श्री मोरे, गट शिक्षण अधिकारी श्री काळे,केंद्रप्रमुख श्री पवार, विस्तार अधिकारी श्री नाकट, सरपंच श्री.प्रल्हाद गोतमारे, ग्राम सेवक श्री भांगे शाळेच्या मुख्याध्यापीका सौ.विमल डोंगरे आणि शिक्षक रेवासकर,भटकर, वाडकर सर सौ.भटकर ,बाहे सर व शाळा व्य.स.अध्यक्ष ग्यानदेव अंभोरे, विलास सरदार चंद्रमनी अंभोरे, डोंगरे उपस्थित होते.मुख्यकार्यपालन अधिकारी श्री सौरभ कटीयार यांनी शाळेविषयी समाधान व्यक्त केले.
Post Views: 241