शासकीय दूध योजना पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर लायसे उपाध्यक्षपदी शरद सनगाडे सचिवपदी श्री शांतीराम मस्के यांची अविरोध निवड


 संजय देशमुख  18 Jan 2022, 1:32 PM
   

अकोला : श्री गजानन शासकीय दूध योजना कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अकोला रजिस्टर नंबर 10 58 च्या निवडणूक प्रक्रियेच्या प्रक्रियेमधून संस्थेची निवडणुकी अविरोध करण्यात आली. संस्थेच्या सभासदामधून 11 संचालक यांची अविरोध निवड करण्यात आली त्यामध्ये सर्व श्री मनोहर लायसे, श्री शांतीराम मस्के, श्री भारत दाभाडे, श्री रामदास करवते, श्री संतोष राजनकर, श्री तुळशीराम जाधव, श्री केशव गोपनारायण, श्री रमेश मानकर, श्री शरद सनगाडे तसेच महिला संचालका मधून श्रीमती पुष्पा हरणे व श्रीमती रेखा दंदी, या संचालकाची अविरोध निवड करण्यात आली. अविरोध निवडून आलेल्या संचालकां मधून संस्थेच्या अध्यक्षपदी श्री मनोहर लायसे, उपाध्यक्षपदी श्री शरद सनगाडे, तसेच सचिवपदी श्री शांतीराम मस्के, यांची अविरोध निवड करण्यात आली. पदाधिकार्‍यांच्या निवडी चे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार अधिकारी श्री जयंत साहरे साहेब कार्यालय तालुका उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी कामकाज पाहिले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली व नवनिर्वाचित अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सचिव, तसेच संचालक व निवडणूक अधिकारी यांचे संस्थेचे व्यवस्थापक श्री राजेंद्र झामरे यांनी आभार व्यक्त केले.

    Post Views:  300


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व