मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. बहुमत सिद्ध करा, या आशयाचं हे पत्र आहे. काल रात्रीच हे पत्र पाठवण्यात आलं होतं. राज्यपालांनी हे पत्र पाठवल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागेल. बहुमत सिद्ध करण्याच्या उद्देशानं हे पत्र पाठवण्यत आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकर आता विशेष अधिवेशन लावलं जाण्याची शक्यता आहे. 39 आमदारांनी पाठिंबा काढल्यानं सरकार अल्पमतात आल्याची माहिती राज्यपालांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र आता सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. नेमकी ही बहुमत चाचणी कधी होणार, हे देखील स्पष्ट करण्यात आलंय. उद्या (30 जून) ही बहुमत चाचणी पार पडेल.
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी 21 जूनला बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांना शिवसेनेतल्या आमदारांचा पाठिंबा वाढत गेला. गुवाहाटीतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे गटाकडे एकूण 39 आमदारांचा पाठिंबा आहे. या आमदारांनी उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सरकार करण्यासाठी हाक दिली होती. तर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची आग्रही मागणी केली होती. आज या बंडाचा नववा दिवस आहे. या बंडाच्या आठव्या दिवशी म्हणजेच काल, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांनी रात्री उशिरा भेट घेतली होती. सरकार अल्पमतात असल्याची माहिती त्यांनी राज्यपाल यांनी प्रत्यक्ष भेटून दिली होती. त्यामुळे राज्यपालांनी याबाबत योग्य तो निर्णय़ घ्यावा आणि सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
दरम्यान, गुवाहाटी येथे बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्या मुंबईला पोहोचणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता उद्याच बहुमत चाचणीला महाविकास आघाडी सरकराला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोललं जाईल आणि त्यानंतर आता उद्याच बहुमत चाचणी होणार असल्याचं स्पष्ट झालंय. गुवाहाटीच कामाक्षी देवीच्या मंदिरासाठी गेले असता ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, आता कोर्टात काही गोष्टी असताना, विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय. त्यामुळे महाविकास आघाडी आता सुप्रीम कोर्टात याप्रकरणी दाद मागण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असल्यानं नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचंय.
Post Views: 182
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay