अकोला : विदर्भ कॅरम अकॅडमी, अकोला द्वारे आयोजित जिल्हास्तरीय बुद्धीबळ सामन्यात प्रभात किड्स स्कूलच्या अर्णव गोलोकार आणि ओजस अंबेरे यांनी उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे.
स्कूल स्पोर्ट फेस्टीवल २०२३ अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटात इयत्ता चवथीच्या अर्णव सुनिल गोलोकार याने उत्कृष्ट खेळ सादर केला आणि प्रथम पारितोषिकासह १००० रुपयाचे रोख बक्षिस प्राप्त केले. तसेच प्रभातचा इयत्ता सातवीतील ओजस रविंद्र अंबेरे याने १४ व १७ वर्षाखालील दोन्ही वयोगटात उत्कृष्ट खेळ सादर करुन द्वितीय पुरस्कारासह ८०० रुपये रोख पारितोषिक प्राप्त केले. दोन्ही विजयी बुद्धिबळपटूंना प्रभातचे बुद्धीबळ प्रशिक्षक जितेंद्र अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, शाळा समन्वयक मो. असिफ, क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षकांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले आहे.
Post Views: 78
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay