कापशी रोड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वे कधी होणार ?


संतप्त शेतकरी व गावकरी यांचा सवाल
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  24 Jul 2023, 7:47 PM
   

कापशी : अकोला तालुक्यातील कापशी रोड येथे  शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते शनिवार दिवसभर सुरु झालेल्या  जोरदार पाऊसाने कहरच केल्याने अतीवृष्टी पाऊस पडल्याने   कापशी रोड गावातील घराचे व शेतीमधील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .त्यामुळे शेतमजूर व शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असतांना आज चार ते पाच दिवस उलटुनही ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी सचिव किंवा महसूल तलाठी कोणीही अधिकारी कर्मचारी  फरकला नसल्याने गावामध्ये संतपाची लाट उसळली असून या कडे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. 
कापशी रोड गावात घराच्या सभोवताल पाणीच पाणी पुरासारखा पाणी वाहत असल्याने काही नागरिकांच्या घराची पायवाट बंद झाली आहे.
घरांच्या सभोवताल पाणी असल्याने साप, विंचू, कीटक,यांचेपासून घरातील लोकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची भीती वाटत आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांचे, महिलांचे, नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता आहे. .
कापशी रोड भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांवर असलेल्या संकट कालीन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन व झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन  दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.आहे.एवढे होत असतांना गावात ना तलाठी आले ना ग्रामसेवक यांनी साधी विचारपूस केली आणि नागरिकांना धीर दिला नाही याकडे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. 


माझ्या घरामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने घरामधील सर्व साहित्य नासधूस झाले मी याबासत कापशी रोड सचिव यांना लेख कडविले परंतु माझ्या लेखी पत्रावर मला सचिवांनी पोच सही न देता तसेच चालते केले तरी याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देवून मला मदत मिळवून देण्यात यावी. 
सुरज केवट 
ग्रामस्थ कापशी रोड


शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते शनिवार दिवसभर सतत धारा पावसामुळे गावातील  अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने नागरिकांच्या सामानाची नासधूस झाली अनेकांना रात्रदिवस घरातील पाणी बाहेर काढण्यात दिवस रात्र गेली अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे आणि दुसर म्हणजे ज्या  बाजार हर्राशी वर दरवर्षी लाखो रुपये जमा होतात त्या बाजाराचे पावसाचे संपुर्ण पाणी हे जिल्हा परिषद शाळा  च्या वर्गखोल्यात जात आहे व शाळेत जाता येत नाही परिसरात पाणीच पाणी आणि ही बोंब दरवर्षी असते पण याकडे कोणाचे कसे लक्ष जात नाही का ?हि  नैसर्गिक आपत्ती तर आपण कोणीही थांबवू शकत नाही पण येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तर पहिलेच करू शकतो ना ,नाही तर काय म्हणे आदर्श गाव ही आदर्शाची डिग्री तुम्हाला लख लाभो असे संतप्त नागरिकांन मध्ये बोलल्या जात आहे.

    Post Views:  486


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व