पहिल्या दिवशी १३५ नागरिकांचे आधार कार्ड अपडेट शिबीर दुरूस्तीसाठी झुंबड


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  05 Apr 2023, 6:13 PM
   

अकोला  : अँड.  धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प च्या माध्यमातून सातव चौकातील इंद्रप्रस्थ अपार्टमेंट मध्ये दिनांक ५  एप्रिल बुधवार पासून तीन दिवसीय आधार अपडेट शिबीर आयोजित करण्यात आले आहे . आज शिबिराच्या पहिल्या दिवशी साधारण १३५ च्यावर नागरिकांनी मोबाईल क्रमांक दुरूस्ती, बायोमेट्रिक अपडेट , पत्ता दुरूस्ती , जन्म दिनांक दुरुस्ती , १८ वर्षांखालील मुलांकरिता नविन आधार कार्ड यासारख्या गोष्टी लोकांना जठारपेठ , रामदास पेठ  , तापडिया नगर याभागातील नागरिकांना घराजवळ उपलब्ध करून देण्याचा मानस घेवून अँड धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प , निलेश देव मित्र मंडळ यांच्या वतीने ३ दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे  , तेव्हा अजून आपल्या सर्व गोष्टी बाकी असल्यास जन्म दिनांक दुरूस्ती करिता जन्म दाखला किंवा बाँड सर्टिफिकेट आवश्यक असते , पत्ता दुरुस्ती करिता बॅक पासबुक , मतदार कार्ड, ड्रायव्हिंग  किंवा तत्सम पुरावा आवश्यक  , नविन आधार कार्ड करिता जन्म दाखला आवश्यक असे कागदपत्रे घेऊन आपण उद्या गुरुवारी  , व शुक्रवारी सातव चौकातील इंद्रप्रस्थ अपार्टमेंट येथे येवू शकता  , असे  आवाहन निलेश देव मित्र मंडळ वतीने करण्यात आले आहे.

    Post Views:  236


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व