कोरोना लस घेतल्यामुळे आपल्या मुलीचा मृत्यू; उच्च न्यायालयात याचिका दाखल


 संजय देशमुख  02 Feb 2022, 8:03 PM
   

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. पण, लस घेतल्यामुळे अनेक जणांना त्रास झाल्याची प्रकरण समोर आली आहे. औरंगाबादेत कोरोना लस  घेतल्यानंतर एका तरुणीचा मृत्यू झाला. लशीमुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या वडिलांनी केला असून लस उत्पादन कंपनीविरोधात 1000 हजार कोटींची दावा केला आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा औरंगाबादच्या एका नागरिकांनी केला आहे. इतकंच नाही तर या पित्याने एक हजार कोटींचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. दिलीप लुणावत असे याचिकाकर्त्यांचे नाव आहे. त्यांची मुलगी डॉ. स्नेहल लुणावत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील दंत महाविद्यालयात होती. स्नेहलने 28 जानेवारी 2021 रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. परंतु 1 मार्च 2021 मध्ये तीच मृत्यू झाला. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस असुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. परंतु, हा दावा खोट्या व चुकीचा असल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचं याचिकाकर्त्याचे म्हणणं आहे.

    Post Views:  247


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख