वासुदेव खोपडेची कविता नवोदित साहित्यिकांना प्रेरणा देणारी - संजय एम.देशमुख


अंकुर साहित्य संघाकडून वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Jun 2025, 8:39 AM
   

अकोला : स्थानिक गणेश गार्डन येथील अंकुर साहित्य संघाच्या  कार्यालयात  आयोजित  माजी पोलीस अधिकारी तथा ज्येष्ठ साहित्यिक अंकुर साहित्य संघाचे विदर्भ अध्यक्ष  श्री  वासुदेवराव खोपडे  हे पोलीस विभागात राहून साहित्याची जोपासना ज्यांनी केली असे ज्येष्ठ साहित्यिक खोपडे नवोदित  साहित्यिकांसाठी खरोखरच एक आशेचा किरण आहेत. या वयातही ते साहित्य कविता लिहून समाजाची सेवा करतात. व नवोदित साहित्यिकांना प्रेरणा देतात याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे असे प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय माणिकराव  देशमुख यांनी  केले.  विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तू बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य पुष्पराज गावंडे, प्रा. सदाशिव शेळके. किशोर बळी सत्कारमूर्ती वासुदेव खोपडे   संदीप देशमुख आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय कावरे यांनी तर आभार यांनी मानले आभार धीरज चावरे यांनी मानले कार्यक्रमांमध्ये  अंकुर साहित्य संघाचे सर्व शिलेदार अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष हिम्मत ढाळे तुळशीराम बोबडे शिवलिंग काटेकर प्रा. मोहन काळे अनिल  दाहेलकर सुनील लव्हाळे सुनील दिवणाले प्रभाकर दिवनाले कांती शिर सागर प्रा. किरण वाघमारे अंबादास चांदुरकर राजाभाऊ देशमुख गजानन छबिले धीरज भोंडे प्रशांत भोंडे सुरेंद्र क्षीरसागर गोपाल मापारी. आदी साहित्यिक पत्रकारांची उपस्थिती होती.

    Post Views:  54


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व