जनते सोबत आपल्याही सुरक्षेची काळजी घ्यावी--रायगड भूषण जयपाल पाटील


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  18 May 2022, 8:59 AM
   

पेण : जिल्हाधिकारी रायगड डॉ . महेंद्र कल्याणकर यांचे मार्गदर्शन खाली,प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी पेण तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, कोतवाल, सरपंच व उपसरपंच यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिराचे नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजन केले होते. कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्षपदी नायब तहसीलदार सुरेश थळे रायगड भूषण आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील डॉक्टर सिद्धार्थ पाटील पत्रकार किरण बाथम, एडवोकेट गोपाळ शेळके, डॉक्टर अजित बर्गे कराटे बेल्ट धारक अमिता घरत, अमिषा घरत या उपस्थित होत्या तलाठी ग्रामसेवक कोतवाल मंडळ अधिकारी आणि सरपंच उपसरपंच हे कायम जनतेची सेवा करतात अशावेळी आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे नाहीतर आपल्यावरच आपत्ती येऊ शकते असे रायगड भूषण जयपाल पाटील यांनी सांगून आपले घर, घरातील विजेच्या वस्तू ,वाहने अपघात, साप व विंचू दंश याबाबतचे प्रात्यक्षिक दाखविले यामध्ये अपघात प्रसंगी 108 रुग्णवाहिकेचे प्रात्यक्षिक दाखवितात 20व्या मिनिटात डॉक्टर अजित बर्गे हे 108 रुग्णवाहिका सहित हजर झाले तर आग लागल्यास वर पहिल्या माळ्यावरील ज्येष्ठ नागरिकांना खाली कसे आणावे हे प्रात्यक्षिक दिले, त्याचबरोबर आपत्ती कायद्याची माहिती दिली महिलांवर लग्नानंतर येणाऱ्या आपत्तीसाठी कौटुंबिक कायद्याची माहिती एडवोकेट गोपाळ शेळके यांनी तर पत्रकारांसोबत आपत्ती येऊ नये म्हणून ज्येष्ठ पत्रकार बातम्यांचे मार्गदर्शन स्वच्छता व आरोग्य बाबतच्या आपत्तीवर डॉक्टर सिद्धार्थ पाटील यांनी माहिती दिली, तरुणींना नोकरी करणाऱ्या वर आपत्ती येऊ नये म्हणून ब्लॅक बेल्ट धारक घरत भगिनींनी प्रात्यक्षिक द्वारे माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार सुरेश थळे यांनी सांगितले की पावसाळा जवळ घेऊ लागला आहे आणि कधी किंवा नैसर्गिक आपत्ती येऊ शकते हे सांगता येत नाही यासाठी महसूल चे प्रतिनिधी म्हणून सतत कार्यरत असणाऱ्याना आपत्ती व्यवस्थापनाची माहिती असणे गरजेचे आहे यासाठी  अत्यंत महत्वपूर्ण माहिती व प्रात्यक्षिक रायगड भुषण,आपत्ती व्यवस्था पन तज्ञजयपाल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. याचा लाभ सर्वांना होईल कोविड कार्य काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खारपाडा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.रश्मी दयानंद भगत  यांचा यावेळी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास तालुक्यातील 90 जण तलाठी कोतवाल ग्रामसेवक मंडळ अधिकारी सरपंच उपसरपंच उपस्थित होते.

    Post Views:  215


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व