प्रेमअंश कडून जीवन संवर्धक अनाथाश्रमात जीवनावश्यक व शालेय वस्तूंचे वाटप


 विश्व प्रभात  17 Dec 2024, 1:03 PM
   

डोंबिवली - प्रेमअंश बहुउद्देशिय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था*  ही संस्था समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अस्तित्वात आहे, या संस्थे अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात.  *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ठाणे जिल्हा संपर्क तथा संघटन प्रमुख ,तसेच प्रेमअंश या संस्थेच्या संस्थापक - अध्यक्षा  सौ. सुषमा विनायक ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक ०८/१२/२०२४ रोजी टिटवाळा येथील *जीवन संवर्धन* या अनाथ आश्रमाला नुकतीच  भेट दिली.  तेथील मुलांना वापरता येतील असे काही कपडे , खेळणी, वह्या , पेन, मसाले तसेच इतर पदार्थ आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.. या कार्यक्रमात तेथील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झालेला दिसला आणि त्यांच्या या हसऱ्या चेहऱ्यानी सर्वांचे मन प्रसन्न झाले....  हा कार्यक्रम यशस्वी करण्यास *श्री विनायक ठाकुर, श्री विक्रम बनसोडे, श्री गणेश जेपाल आणि संस्थेचे बाल सभासद कु. समर्था, कु. शुभेच्छा, कु. हार्दिक, कु. देविका* या संस्थेच्या सभासदांचा मोलाचां वाटा आहे.  मित्रहो आपण ही *प्रेमअंश संस्थेच्या*  अशा विविध उपक्रमात सहभागी होवून,वेळोवेळी  संस्थेस सहकार्य करून त्या चिमुकल्यांचा आनंद  द्विगुणित करण्याचा प्रयत्न करावा अशी आपणास विनंती आहे.
 संस्थेच्या उपक्रमांत सहभागी होण्यासाठी ८४१९९४५९०५ या क्रमांकावर संपर्क करावा.

    Post Views:  60


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व