पुढील ग्लोबल खान्देश महोत्सवाच्या आत खान्देशभवनची पायाभरणी होणार : खासदार श्री श्रीकांतजी शिंदे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
06 Mar 2024, 2:49 PM
कल्याण - (सुनिल इंगळे) : दैदिप्यमान, वैभवशाली नविन आयाम देणारा ग्लोबल खान्देश महोत्सवाची दिमाखदार सांगता ऐतिहासिक, व सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या उद्यमशील व उद्योगशील स्मार्ट , सुंदर , स्वच्छ कल्याणनगरीत ५ मार्च २०२४ ला फडके मैदान, लाल चौकी कल्याण (प) येथे दिमाखात संपन्न झाला.
महोत्सवात माननीय श्री रामेश्वर नाईक, श्री विश्वासराव पाटील यांना खान्देशभूषण पुरस्कार, श्री उन्मेश वाघ, श्री योगेश पाटील, श्री जयंत पाटील यांना खान्देश्री पुरस्कार, मा. श्री संजयजी बोरगावकर यांना खान्देश उद्योगभूषण पुरस्कार, कला क्षेत्रातील खान्देश्री पुरस्काराने श्री सचिन कुमावत आणि पुष्पा ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी राज्यातील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आमदार ॲड .निरंजनजी डावखरे, आमदार श्री संजयजी केळकर, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिलजी पाटील, श्री सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, श्री निलेश सांबरे, खासदार श्री श्रीकांतजी शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघ, श्री अनिल पाटील मदत व पुनर्वसन मंत्री, आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे, बदलापूर मा नगराध्यक्ष, वामनदादा म्हात्रे, वरूण पाटील, अंबरनाथचे नगराध्यक्ष मा. सुनील भाऊ चौधरी, श्री प्रेमनाथ म्हात्रे, अर्जून म्हात्रे, शहराध्यक्ष शिवसेना रवीजी पाटील, नगर सेवक उमेश बोरगावकर, नगरसेवक सुनील वायले, नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका वैशाली पाटील, आरोग्य सभापती कल्पना गुंजाळ, माजी नगरसेवक अशोक गुंजाळ, नगरसेवक श्री संजय गायकवाड, के. डी. एम. सी. सचिव श्री संजय जाधव, सह आयुक्त दिलीप सोनवणे, मा. श्री नंदू वाघ डॉ. प्रशांत पाटील, डॉ. शुभा पाध्ये, श्री बिपीन पोटे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढविली. विविध क्षेत्रातील सेलिब्रेटींनी महोत्सवास हजेरी लावली यात नृत्य दिग्दर्शिका श्रद्धा महिरे, महाराष्ट्र हास्यजत्रा फेम निमिष कुलकर्णी, प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट दिलीप केदार यांनी आपल्या कला प्रदर्शनाने प्रेक्षकांची मने जिंकली. महोत्सवात खान्देशातील कळण्याच्या भाकरी वांग्याचे भरीत, धपाटा , लाल मिरचीचा ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा, मासवडी रस्सा, खापरावरची पुरणपोळी ( मांडे) पापड, कुरडया, सांडगे, शेवया अश्या खान्देशी खाद्यपदार्थांची रेलचेल होती. चार दिवसांपैकी पहिल्या दिवशी आंतरशालेय नृत्य स्पर्धेचे आयोजन,दुसऱ्या दिवशी खान्देश बॉलीवूड फेम सचिन कुमावत व पुष्पा ठाकूर यांचे परफॉर्मन्स आयोजन, तिसऱ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या सांस्कृतिक मंच समिती द्वारे अहिराणी गाणी, मराठी हिंदी गाणे ऑर्केस्ट्रा चौथ्या दिवशी विविध सेलेब्रिटी परफॉर्मन्स यासोबतच चारही दिवस सांस्कृतिक मंच समितीने सुंदर, सुमधूर गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
महोत्सवात केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी खान्देश महोत्सव हा खान्देशी खाद्यसंस्कृती व कला संस्कृती यांना चालना देणारा महोत्सव असून दिवसेंदिवस दर्जेदार होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन केले. खासदार श्री श्रीकांतजी शिंदे साहेबांनी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाची सातत्याने मागणी आणि पाठपुरावा लक्षात घेऊन सर्व खान्देशी बांधवांना एकत्र येण्यासाठी कल्याणात लवकरच खान्देशभवन पायाभरणी होईल असे मी वचन देतो आणि हा महोत्सवाचे देखणे रूपडे पहाता अजून मोठ्या जागेत पुढच्या वर्षी जाईल त्यासाठी मदत करणार असे आश्वसत केले. मदत व पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील फक्त सारंगखेडाची जत्रा मोठी होते हा माझा समज कल्याण ग्लोबल खान्देश महोत्सवाच्या वैभवाने, कल्याणकरांचा उदंड प्रतिसाद बघून खोटा ठरला. कल्याणातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील खान्देशवासियांची मोठी जत्रा भरते ही खूपच अभिमानास्पद बाब आहे, विकास पाटील व त्यांच्या टीमने मुंबई व ठाणे यासारख्या महानगरांमध्ये खान्देशचे महत्व व ओळख आणि खान्देशवासीयांना एक चांगले व्यासपीठ महोत्सवाच्या माध्यमातून निर्माण केले आहे. खूप चांगले सामाजिक कार्य आपल्या हातून घडत आहे याबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी कौतुक केले.
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष श्री विकासजी पाटील यांनी खान्देश फेस्टिवल लोकल ते ग्लोबल साई चौक ते वसंत व्हॅली पासून खडकपाडा ते फडके मैदान पर्यंतचा प्रवास उलगडून दाखविला.
स्वागताध्यक्ष नरेंद्रजी(नाना) सूर्यवंशी यांनी खान्देशी माणूस जिद्दीने आणि चिकाटीने कसा सर्व क्षेत्रात कार्यरत आहे आणि सोबतच आपण एकत्र येण्यासाठी काय करायला हवे या सर्व बाबींचीची माहिती दिली. महोत्सवात चारही दिवस सूत्रसंचालनाचे काम श्री विनोद शेलकर, सौ वर्षा पाटील, कु. वैदेही पाटील यांनी आपल्या दमदार आवाजाने केले. संगीतरजनी द्वारे अनेक कलाकारांनी बहारदार गीत सादर केले. कार्यक्रमासाठी कार्यक्रम संघटनेचे कोषाध्यक्ष ए. जी. आप्पा पाटील, उपाध्यक्ष एल. आर. पाटील, प्रदीप अहिरे, बापूसाहेब हटकर, दिगंबर बेंडाळे , सल्लागार सुनील चौधरी, बहिणाई ट्रस्ट चे अध्यक्ष व मुक्तपत्रकार सुनिल इंगळे सोबत सर्व खान्देशी मंडळींनी खूप मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी केला.
Post Views: 127