अकोला: क्रीडा व युवा सेवा संचालनालय पुणे अतंर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत प्रभात किड्स स्कूलच्या १८ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले असून त्यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वसंत देसाई क्रीडांगणावर मैदानी क्रीडा स्पर्धा दि. १३ व १४ डिसेंबर रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत १४ वर्ष मुलांच्या वयोगटात ऋतुराज देशमुख ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पहिला आला; प्रथम गोहेल १०० मीटर, आर्यन कोल्हटकर २०० मीटर तर दर्शन गोलडे ८० मीटर हर्डल रेसमध्ये प्रथम आला. रितेश मालगे, श्लोक काललकर, प्रथम गोहेल आणि ऋुतुराज देशमुख रिले रेसमध्ये प्रथम आलेत. १७ वर्षाखालील वयोगटात समर्थ सोनोने याने गोळाफेक तर श्रावण देशमुख याने ४०० मीटर हर्डल रेसमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. त्याचप्रमाणे भाग्येश हांडे याने भालाफेक क्रीडा प्रकारात द्वितीय, पार्थ मुन्नरवार ८०० मीटर धावण्यामध्ये द्वितीय; तर प्रणव बचे, शर्मन श्रीवास्तव, रोहन हळदे, रिदम शाह यांनी १०० मीटर रिले रेसमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. राजवीर देशमुख याने १०० मीटर हर्डल तर शर्मन श्रीवास्तव याने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. सर्व विजयी खेळाडूंना प्रभातचे क्रीडा प्रशिक्षक संतोष पाटील आणि गजानन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, शाळा समन्वयक मो. आसिफ, क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले असून विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views: 126
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay