देशमुख समाज जागृती मंडळ च्या वतीने डॉ पंजाबराव देशमुख जयंती उत्सव साजरा


 Chief editor  28 Dec 2021, 1:20 PM
   

देशमुख समाज जागृती मंडळ च्या वतीने डॉ पंजाबराव देशमुख जयंती उत्सव साजरा अकोला प्रतिनिधी स्थानिक मिलन सभागृहात भारताचे पहिले कृषीमंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा 127 व जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे कार्य एका समाजासाठी नसून ते विविध समाजासाठी असल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले नवीन कृषी धोरण भारतामध्ये आणण्याचे सर्वात मोठे काम भाऊसाहेबांनी केले आणि बहुजनांच्या शिक्षणाचे कार्य भाऊ साहेबांच्या हातून विदर्भात शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून झालेले आहे असे प्रतिपादन के व्ही देशमुख यांनी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले त्यावेळी देशमुख समाज जागृती मंडळाचे सदस्य व देशमुख समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते त्यामध्ये के व्ही देशमुख घारे राव देशमुख सुनील देशमुख संजय देशमुख संजय कृष्णराव देशमुख प्रकाश देशमुख गजानन देशमुख अमोल देशमुख शैलेश देशमुख मनी श देशमुख अनिल देशमुख राजाभाऊ देशमुख अंकुश देशमुख अश्विन देशमुख दिलीप देशमुख ज्ञानेश्वर देशमुख राजाभाऊ देशमुख सौ मंजू षा देशमुख देशमुख जागृती मंडळाचे सचिव नितीन देशमुख अध्यक्ष संजय कृ देशमुख संदीप देशमुख आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देशमुख यांनी तर आभार नितीन देशमुख यांनी मानले

    Post Views:  683


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व