जागतिक आरोग्य दिनी पार पडला सन्मान सोहळा


आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका सत्काराच्या हकदार! - प्रतिभा भोजने यांचे प्रतिपादन
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  07 Apr 2022, 7:38 PM
   

अकोला : आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका या सत्काराच्या हकदार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने यांनी केले आहे. गुरूवारी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी केलेले आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांचा तसेच फ्लोरेन्स नाईटेंगल पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून प्रतिभा भोजने बोलत होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.उपाध्यक्षा तथा आरोग्य समिती सभापती सावित्री राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जि.प.सदस्था पुष्पा इंगळे, सामाजिक कार्यकर्ते हिरासिंग राठोड, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हरी पवार, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, बार्शीटाकळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भावना हाडोळे, बाळापूरचे डॉ. पवार, मूर्तिजापूरचे डॉ. कराळे, अकोटच्या डॉ. सालफळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना काळात आरोग्य विभागाने केलेल्या कार्याबाबत बोलताना आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका या सत्काराच्या हकदार आहेत, त्यामुळे त्यांचा केलेला सत्कार हा उचित असल्याचे प्रतिपादन प्रतिभा भोजने यांनी केले. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सर्वच कर्मचारी मन लावून काम करीत असतात, परंतु सत्कार हा मोजक्याच लोकांचा करावा लागतो, ही कार्यक्रमाची मर्यादा आहे परंतु आपण केलेल्या रुग्णसेवेमुळेच आज कोरोनासारख्या महाभयंकर साथीच्या आजारापासून आपण जनतेस वाचवू शकलो. त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्याला क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाकरिता ब्रॉन्झ मेडल मिळाले ही उत्कृष्ट कार्याची पावती आहे, असे आपल्या भाषणात नमूद केले. यावेळी फ्लोरेन्स नाईटेंगल पुरस्काराकरिता आरोग्य सेविका, मेट्रन व स्वास्थ्य अभ्यांगता अशा एकूण ७ जणांना पुरस्कृत करण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी 45 आशा आणि ७ गटप्रवर्तकांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी क्षयरोग विभागाचे ५० अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी, सूत्रसंचालन जिल्हा आशा समन्वक सचिन उनवणे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संदीप देशमुख, जिल्हा लेखा व्यवस्थापक दीपक मालखेडे, सचिन डांगे, किशोर फाळके, निलेश भिरड, जया जरोदे, रमण लोखंडे, प्रशांत काळे, प्रसाद मोळके, राहुल भिरडे, शीतल ओळंबे यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हा पुरस्कार वितरण सोहळा होऊ शकला नव्हता. त्यामुळे यावेळी शासन निर्णयानुसार निवेदन देऊन जिल्हा परिषद नर्सेस संघटनेने यासाठी पाठपुरवठा केला. त्याची दखल घेत जि.प. प्रशासनाने निकषाप्रमाणे पुरस्कार वितरण केल्याचे संघटनेच्या अध्यक्षा संगीता जाधव यांनी सांगितले.  
असे देण्यात आले पुरस्कार!
आशा स्वयंसेविका : अडगाव प्रा. आ. केंद्राच्या पुष्पा चव्हाण यांना 8 हजाराचा प्रथम तर पोपटखेड प्रा. आ. केंद्राच्या सुनिता तांबीलकर यांना 6 हजाराचा दि्वतीय पुरस्कार देण्यात आला.
---------------------
गटप्रवर्तक : रेखा अंबेरे (कावसा), पद‍्मा खोलगडे (पारस), बबिता जाधव (पिंजर), सुकेशनी तायडे (पारद), सुमिञा कांबळे (धोञा), जयश्री राहाटे (हिवरखेड), उर्मिला विरघट (दानापूर) यांना प्रत्येकी 2 हजार 857 रूपयांचा पुरस्कार देण्यात आला.
-------------------------  
आरोग्य सखी पुरस्कार : वैशाली पागृत (पळसो) यांना 7 हजार रूपयांचा प्रथम तर कविता मनवर (पिंजर) यांना 5 हजाराचा दि्वतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    Post Views:  198


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व