मंगेश चऱ्हाटे, प्रतिनिधी
कापशी - श्री च्या प्रगटदिनानिमीत्याने नाफेड अंतर्गत लाखनवाडा येथे निंबी मालोकार येथील शेतकरी गोपाल चतरकर यांना शाल श्रीफळ देऊन यांची तुर हमी भावाने खरेदी करुन शुभारंभ करण्यात आला यावेळी एस एस सरप, श्रीधरराव वक्टे, बजरंग पटोकार, दिनकर नकासकर ,शेतकरी गोपाल मालोकार, तुकाराम डाबेराव, गुणवंत मालोकार,आशिष व्यवहारे, ज्ञानेश्वर पारडे आदेश भोंगे, दत्तात्रय वक्टे, स्वप्निल मालोकार, संतोष कसुरकर, गणेश इंगळे ,ज्ञानेश्वर मालोकार ,शामराव तायडे ,अमोल वानखडे, आदी उपस्थित होते.
हंगाम 2024-25 साठी तूर या पिकाची 7 हजार 550 प्रति क्विंटल दराने २० फेब्रुवारी पासून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याच केंद्रांवरून शेतकर्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. अकोला तालुक्यामध्ये पाळोदी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड पाळोदी अंतर्गत तुर नोंदणी व खरेदी शुभारंभ बिलाला चौपाल गोडावून लाखनवाडा येथे करण्यात येईल. दरम्यान, शेतकर्यांनी एफएक्यू दर्जाचा म्हणजेच काहीही कचरा नसलेला चाळणी करून सुकवून माल केंद्रावर आणावा. नाफेड/एनसीसीएफच्या स्पेसीफिकेशननुसार शेतमालाची तपासणी करण्यात येईल. नोंदणी झालेल्या शेतकर्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार एसएमएस देऊन खरेदीसाठी बोलावण्यात येईल. देण्यात आलेल्या तारखेस शेतकर्यांना माल खरेदी केंद्रावर घेऊन येणे बंधनकारक राहील, असेही कळविण्यात आले आहे.
ऑनलाईन पध्दतीने खरेदी प्रक्रिया...
सर्व खरेदी प्रक्रिया ही ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. शेतकर्यांनी नोंदणीसाठी आधारकार्डची, राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते असलेल्या पासबुकची छायांकित प्रत, चालू वर्षाचा 8-अ व 7/12 उतारा आणि तूर पिकाची नोंद असलेला ऑनलाईन पीकपेरा व चालू मोबाईल क्रमांक देणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी पाटील यांनी दिली आहे.
Post Views: 70