अकोला : स्थानिक स्वराज्य भवन अकोला येथे तीन दिवसीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 55 वा पुण्यतिथी पुण्यस्मरण महोत्सव अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने पार पडला. या समारोपारनंतर तिथे असलेला कचरा, पत्रावळ्या, द्रोण, अन्न, कचरा अस्था वेस्त पडलेला असतो तो कचरा हा कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्या दिवशी निर्भय बनो जण आंदोलनाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवून खऱ्या अर्थाने राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेले विचार कृतीत आनुन या ठिकाणी सकाळीच आठ ते बारा वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबऊन पूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला व या ठिकाणी असलेला केर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. हे अभियान निर्भय बनो जन आंदोलनाच्या वतीने दरवर्षी राबवले जाते यावर्षी सुद्धा हे अभियान राबऊन संपूर्ण स्वराज भवन स्वच्छ करण्यात आले. हे अभियान यशस्वी करण्याकरता निर्भय बनो जन आंदोलनाचे संयोजक गजानन हरणे, जिल्हाध्यक्ष तथा स्वच्छतादूत प्रमोद धर्माळे, महानगरअध्यक्ष नंदकिशोर गावंडे, तालुकाध्यक्ष नारायण मानकर, स्वयंसेवक गजानन कदम, रक्तदाते सुरेश राऊत यांनी अथग परिश्रम घेऊन हे स्वच्छता अभियान यशस्वी केले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत.
Post Views: 107
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay