जीपीए अकोला तर्फे प्रजासत्ताक दिन सोहळा तथा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
29 Jan 2024, 1:12 PM
अकोला : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अकोला तर्फे जीपीए हॉल , आदर्श कॉलनीच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन सोहळा तसेच २०२४ ची जीपीए दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला . जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ही अकोल्यातील सर्व पॅथींची एक संघटना आहे . संघटनेचे कार्यालय आदर्श कॉलनी स्थित असून या जीपीए हॉलच्या प्रांगणात २६ जानेवारी २०२४ ला सकाळी नऊ वाजता अकोला पूर्व विधानसभेचे आमदार मा. रणधीरभाऊ सावरकर यांचे शुभ हस्ते तसेच मा. जयंत मसने , नगरसेवक अकोला आणि
मा. डॉ. शंकरराव वाकोडे संस्थापक छावा संघटना यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच जीपीएचे मार्गदर्शक डॉ. किशोर मालोकार , डॉ. चंद्रकांत पनपालिया , डॉ. सुनिल बिहाडे , डॉ. फोकमारे , डॉ. अशोक ओळंबे , जीपीएचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सतीश उटांगळे , जीपीएचे सचिव डॉ. विनय दांदळे प्रोजेक्ट इन्चार्ज डॉ.नरेंद्र गोंड डॉ. संदीप चव्हाण यांचे उपस्थितीत माननीय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांचे शुभहस्ते सर्वप्रथम ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देऊन राष्ट्रगीत गाईले गेले . त्यानंतर मा. आमदार रणधीरभाऊ सावरकर यांचे शुभहस्ते , प्रमुख अतिथी मा. जयंत मसने , मा. डॉ. शंकरराव वाकोडे , जीपीएचे मार्गदर्शक डॉ. किशोर मालोकार , डॉ. चंद्रकांत पनपालिया , डॉ. सुनील बिहाडे , डॉ. राजेंद्र अग्रवाल , डॉ. सुनील फोकमारे , डॉ . राजेंद्र अग्रवाल ,अध्यक्ष डॉ. सतीश उटांगळे , जीपीएचे सचिव डॉ. विनय दांदळे , उपाध्यक्ष डॉ. प्रवीण अग्रवाल , डॉ . संदीप चव्हाण , कोषाध्यक्ष डॉ . आदित्य नानोटी आणि इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते जीपीए दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले . याप्रसंगी ह्या प्रजासत्ताक दिन सोहळा आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास जीपीएचे सहसचिव डॉ. दीपाली भांगडीया , डॉ. प्रियंका देशमुख , डॉ . युवराज देशमुख , डॉ. चंद्रकांत वाघमारे , डॉ . प्रद्युम्न शाह , डॉ.संजय तोष्णीवाल , डॉ . अनिल तोष्णीवाल , डॉ. रवी आलिंचंदानी , डॉ. रोठे , डॉ. कऱ्हे , डॉ सुभाष बढे , डॉ.राजेश काटे , डॉ. पांडुरंग धांडे , डॉ. गजानन माळी , डॉ . रॉकेश शाह , डॉ .नरेंद्र श्रीवास , डॉ . अरविंद गुप्ता , डॉ. पंकज गुप्ता , डॉ . राजू देशपांडे , डॉ. प्रशांत सांगळे , डॉ . उज्वल कराळे , डॉ . सौ .राजपूत , डॉ .सौ. महल्ले , डॉ . आशिष पनपालिया , डॉ. सुनील लुल्ला , डॉ. सुनील देशमुख , डॉ . जाधव, डॉ. प्रवीण चव्हाण , डॉ. राजकुमार भांगडीया , डॉ. महेश गुप्ता , डॉ.नितीन धनोकर यांचेसह बहुसंख्य डॉक्टर सदस्य उपस्थित होते . संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन जीपीए सचिव डॉ . विनय दांदळे यांनी तर प्रास्ताविक जीपीए अध्यक्ष डॉ. सतीश उटांगळे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रोजेक्ट इंचार्ज डॉ . नरेंद्र गोंड यांनी केले . शेवटी जीपीए चे दिवंगत सदस्य तसेच सदस्यांचे दिवंगत नातेवाईक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
Post Views: 173