दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट केली कोजागिरी केली धुमधडाक्यात साजरी
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Oct 2024, 11:19 AM
अकोला:- कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी महालक्ष्मी पृथ्वीतलावर येवून रात्रभर जागरण करणाऱ्यांना देवी महालक्ष्मी आशीर्वाद देते असे वालखिल्य ऋषींचे मत असल्याचे बोलल्या जाते.
कोजागिरी पौर्णिमेचे निमित्त साधून रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट च्या अध्यक्षा सौ पूनम मुंदडा सेक्रेटरी रमण राठी प्रोजेक्ट सेक्रेटरी मनोज मालोदे यांनी जुलै 2024 पासून १७ प्रोजेक्ट पूर्ण केले.त्यातलाच एक भाग म्हणून जेष्ठ रोटेरियन पुरुषोत्तम जी श्रावगी यांचे शाही निवासस्थानी चंन्दाच्या साक्षीने आणि लूकलूकणाऱ्या चांदण्या रात्री कोजागिरी पौर्णिमेचे आयोजन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पी. पी. एडवोकेट श्रीकांत सुरेका यांच्या आमंत्रणाला मान देऊन जिल्हा न्यायालयातील अधीक्षक अतिथी तथा उत्कृष्ट गायक देशमुख साहेब यांनी गणरायांना वंदन करून सुमधूर आवाजात अनेक गीत गाऊन उपस्थित रोटेरीयांचे मने जिंकली, एवढेच नाही तर त्यांच्या गाण्यावर अनेकांनी ठेका धरून मनसोक्त नाचून आनंद व्यक्त केला. अनेक रोटेरियन गायनाच्या कार्यक्रमात भाग घेतला त्यात रोटेरियन एडवोकेट श्रीकांत सुरेका, संजय पिंपरकर, ब्रिज मोहन चितलांगे, मनोज मालोदे काजल राज वैद्य, भारती शेंडे, ताजणे सर, पुरुषोत्तम श्रावगी, त्यांची नात आणि सून आणि अनेक रोटेरियन यांनी गीते सादर केली.
सप्टेंबर,ऑक्टोबर मध्ये जन्मलेल्या एन्स मंजुषा केडिया, आरती लड्डा ,कोमल साधवानी, रश्मी खत्री, श्रद्धा लखोटिया, कविता श्रावणी ,ज्योती जैन, माई उर्फ ज्योती बाहाकर ,पल्लवी दुबे,सबीरा मोइज अकोलावाला, अलका सेंगर यांच्या जन्म दिवसानिमित्त अध्यक्षा सौ.पूनम मुंदडा,सौ.निशा सुरेका,सौ.मंगला श्रावगी आणि एन्स यांनी उपस्थित एन्स यांना टियारा लावून आणि प्रत्येक एन्स यांना गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान केला. सौ.कविता श्रावगी यांनी उपस्थित महिलांना कुमकुम तिलक आणि सौभाग्याचा गजरा लावून त्यांचा सन्मान केला. सात फेरे या (Couple) खेळात प्रथम क्रमांक रोटे. अशोक अग्रवाल सौ ज्योती अग्रवाल या दापत्यांना मिळाला.तसेच Kojagiri Queen सौ.कोमल साधवानी प्रथम,आणि सौ.संध्या मालोदे द्वितीय यांना ही पुरस्कार मिळाला.अध्यक्षा सौ.पूनम मुंदडा आणि टीमने कोजागिरी सणाचे उत्कृष्ट आयोजन, नियोजन केले. कोणत्याही कार्यक्रमात स्वादिष्ट भोजन असल्याशिवाय कार्यक्रम यशस्वी झाल्याचे वाटत नाही. आयोजकांनी यावर्षी कोजागिरी खीरी शिवाय
मेनू ही चटपटीत आणि स्वादिष्ट असल्यामुळे प्रत्येक रोटेरियनची जीभ आणि पोटोबा सुखावला
प्रत्येकाने आपापल्या परीने कार्यक्रमात भाग घेतला. रोटेरियनची उपस्थिती आणि बहुसंख्य रोटेरीयन ड्रेस कोड मध्ये होते हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य. पुरुषोत्तम श्रावगी यांनी सेक्रेटरी रमण राठी यांना महत्वाचे काम असल्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकत नसल्यामुळे यांच्या वतीने सर्वाना शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा सौ.पुनम मुंदडा यांनी केले.व सेक्रेटरी यांनी रोटे.डॉ.जे.डी.वाघेला,सौ.वीना जे. वाघेला आणि कुटुंबीयांनी दान दिलेल्या आणि रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट च्या स्वप्नातील भवनाच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहण्याचे सांगितले.तसेच यावर्षी दिवाळीला स्लम एरियात कपडे व दिवाळी फराळ वाटपाला मदत करण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे संचालन रोटे .सौ.भारती शेंडे यांनी केले.आभार सौ.पूनम मुंदडा यांनी केले. कार्यक्रमाला सौ पूनम मुंदडा, मनोज मालोदे पंचशील चौधरी ,विजय बाहाकर , ब्रिज मोहन चितलांगे, सत्यनारायण खोरीया, एडवोकेट श्रीकांत सुरेका,ओंकार गांगडे, वैजनाथ कोरकणे, ओम प्रकाश गोयंका,मोहन काकानी, भूषण ताजणे, आशिष जाजू ,अमोल बेलखेडे, पुरुषोत्तम पसारी, उमेश राठी, सुरेश साधवानी डॉक्टर जे डी वाघेला, सौ.विना जे.वाघेला,श्री अशोक मुंदडा,काजल राज वैद्य, मोहीझ अकोलावाला , पुरुषोत्तम श्रावगी, भारती शेंडे, मयूर सिंघानिया, संजय पिंपरकर, मनोहर विरवाणी, विशाल तडस, उज्वल दुबे, इस्माईल नझमी, लक्ष्मण खत्री, प्रकाश दाते, संजय श्रावगी, संजय गांगडे ,श्याम गोटफोडे, सुरेश नाथे आदी रोटेरियन आपल्या कुटूंबासह कोजागिरी कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता..चलते... चलते.. मेरे गीत याद रखना..या गीतावर उपस्थितांनी ताल धरून झाली. असे रोटेरियन विजय बाहाकर कळवितात.
Post Views: 127