राहुट्यांमधील चोऱ्यांमुळे मजूर टोळ्या त्रस्त


पोलिसांच्या कार्यवाहीची सरपंच व गावकऱ्यांची मागणी
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  18 Dec 2024, 8:13 AM
   

(वैभव हराळ) जिल्हा प्रतिनिधी: 
तांदळी दुमाला येथील कारखानदारीसाठी आलेल्या मजूरांशा  राहण्यासाठी राहूट्या उभारल्या जातात. त्यांना पक्के घर नसल्या कारणाने त्यांच्या या राहूट्यांमधून मोबाईल आणि पैशांच्या  चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढल्याने बाहेरगावाहून पोटासाठी येणारे हे मजूर त्रस्त झालेले आहेत. श्रीगोंदा पोलिस स्टेशनने याकडे जातीने लक्ष देऊन या  भुरट्या चोरांना पकडण्याची धडक मोहिम राबवावी.अन्यथा चोऱ्यांच्या नंतर आता दरोडे पडण्यास वेळ लागणार नाही. अशी भिती तांदली दुमांला येथील सरपंच व टोळी चालक दिपक शिंदे यांनी व्यक्त केली आहे.तांदळी गावातील अनेक ऊस टोळी मजुरांना ऊस कटाई करण्यास दिवसभर शेतकऱ्यांच्या फडास जावे लागते. त्यात हे चोर आणि गुन्हेगारांच्या  त्रासाने ते संतप्त झाले असून  त्यामुळे आपल्या गावी जावे असे मनोदय ते व्यक्त करीत आहेत. यामुळे शेतकरी सुध्दा चिंतातुर आहेत. गृह विभागाने लवकर दक्षता घ्यावी अशी  मागणी तांदळी  दुमाला सरपंच संजय निगडे, विशाल शिंदे,(सहकार सोसायटी संचालक ) नाना दांगडे,आबा भोस (ग्रामपंचायत सदस्य),झुंबर खुरांगे टिळक भोस (सामजिक कार्यकर्ते) नवनाथ भोस ,नितीन लगड,( उप सरपंच तांदळी)महेश भोस यांनी केली आहे.

    Post Views:  75


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व