परम पूज्य योगऋषि स्वामी रामदेव जी महाराज तसेच परम पूज्य श्रद्धेय आचार्य श्री बालकृष्ण जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय श्री दिनेशजी राठोड राज्य प्रभारी यांचे मार्गदर्शनात , भारत स्वाभीमान न्यास महाराष्ट्र पूर्व, आदरणीय श्री संजय जी चाफड़े , राज्य कार्यकरिणी सदस्य भारत स्वाभिमान ट्रस्ट अकोला जिल्हा प्रभारी हरीशभाई माखीजा, पतंजलि योग समिति युवा प्रभारी कपिल लाड, पतंजलि योग समिति चे सह जिल्हा प्रभारी हरीश भाई पारवानी, मेटकर जी, सोनोने जी, यांच्या सह सिंधू सीनियर सिटिजन असोसीएशन हॉल मधे बैठक संपन्न झाली, सदर बैठकीत अत्यंत महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने नागरीकांना योगासोबत जोडणे, योगकक्षेचा विस्तार करणे आजीवन सदस्यांची संख्या वाढवणे यावर चर्चा झाली. त्यांनतर. मान्यवरांच्या शिफारशींनुसार सक्रिय सहयोगी योग शिक्षकांना पतंजलि योगपिठ हरिव्दार यांचेकडून प्राप्त जॅकेट सन्मानपूर्वक भेट म्हणून देण्यात आले. तसेच पतंजलि योगपिठ हरिव्दार कडुन प्रशिक्षित तीन मुख्य शिक्षकांना प्रमाणपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले. त्यानंतर बैठकीची सांगता झाली. सदर बैठकीत अकोला जिल्हा पतंजलि योगपिठ संबंधित सर्वं पदाधिकारी गण,कोअर कमिटी सदस्य, तसेच सक्रिय योग शिक्षक उपस्थित होते.
Post Views: 10