नियोजन समिती निवडीबाबत शंकरराव इंगळे यांचे हुशे ज्वेलर्समध्ये स्वागत


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2022-08-31
   

अकोला-- इंगळे ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक,वंचित बहूजन आघाडीचे शहर अध्यक्ष व अकोला जिल्हा परिषद सदस्य श्री शंकरराव इंगळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीत विजय प्राप्त केला.त्यांच्या विजयाचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
            या प्राप्त विजयाबद्दल हुशे ज्वेलर्समध्ये जेष्ठ सामाजिक नेते प्रा.डॉ.संतोषभाऊ हूशे व पत्रकार संजय एम.देशमुख,निंबेकर यांनी त्यांचे अभिनंदन करून हार घालून स्वागत केले.त्यांची वाटचाल,कर्तव्याच्या बांधिलकीच्या प्रखर सामाजिकतेबध्दल त्यांचे कौतूक करून त्यांच्या भावी यशस्वी राजकीय वाटचालीसाठी याप्रसंगी प्रा.डॉ.संतोषभाऊ हूशे व पत्रकार संजय देशमुख व अमोल कलोरे यांनी त्यांना मन:स्वी शुभेच्छा व्यक्त केल्या.

    Post Views:  293


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व