गायत्री संस्कार केंद्रात आषाढी एकादशी उत्सव संपन्न


 संजय देशमुख  2022-07-11
   

अकोला: स्थानिक कृष्ण नगरी कौलखेड अकोला येथे बालसंस्कार केंद्रात आषाढी एकादशी उत्सव बालगोपाल सोबत गायत्री दीप यज्ञ द्वारे साजरा करण्यात आला. बालगोपालांना वारकरी वेशभूषा मध्ये तयार करून विठ्ठल रखुमाई तयार करून कृष्ण नगरी परिसरात विठ्ठल नाम गजरात टाळकरी दिंडी काढण्यात आली. पावली खेळण्यात आली. बालगोपाल मध्ये जबरदस्त उत्साह होता, सर्वांनी आज उपवास पाळला होता.अखिल विश्व गायत्री परिवाराचे संस्थापक यांनी सांगितले आहे आता लेकरं बालगोपाल करतील युग निर्माण

गायत्री दीपयज्ञ द्वारे विश्व शांति, सर्वांना सद्बुद्धी मिळो साठी भावनात्मक आहुती प्रदान करण्यात आली. यामिनी दीदी यांनी भक्त पुंडलिक व विठ्ठल उभा विटेवरी यांची गोष्ट सांगितली. आई, वडील, गुरु, समाज,दीनदु:खी यांच्या 
सेवेसाठी नेहमी तयार राहावे, आपला परिवार आई वडील,गुरू, व देव खुश राहावेत याप्रमाणे वाटचाल करावी. वाढदिवसाला एक झाड लावून संगोपन करण्याचे संकल्प बालगोपाल व त्यांच्या पालकांना देण्यात आले. सामुदायिक प्रार्थना व राष्ट्रवंदने द्वारे उत्सव समापन झाले. या उत्सवाच्या सफलते साठी यामिनी दीदी, पल्लवी चवरे, नीता दिवनाले,मंजू करुले, रजनी उपाध्याय,मंजू धुमाळे, सोरमारे मावशी, शीतल फाटे,डा अजय उपाध्याय, ऍडव्हॉकेट प्रवीण करुले , अभय उपाध्ये महाराज,सोरमारे काका, नीतू कराडे ,गायत्री परिवार महिला मंडळ कौलखेड , श्री गुरूदेव सेवा मंडळ कृष्ण नगरी यांनी परिश्रम घेतले

    Post Views:  269


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व