तांदळेश्वर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
25 Jun 2024, 8:25 AM
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला येथील तांदळेश्वर माध्यमिक विद्यालयाचा 2023-24 चा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयातील पहिल्या दहा क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा तांदळी दुमाला ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे यांनी 300 वृक्ष शाळेच्या पटांगणात लावण्यासाठी विद्यालयास भेट दिली.
यावेळी श्रद्धा श्रीकृष्ण धावडे 94 टक्के, आर्या शरद शेळके 93.60, गौरी सतीश बोरुडे 90.60, राजकुंवर युवराज जाधव 88.60, पृथ्वीराज अशोक चव्हाण 88, श्रेया प्रकाश बेरड 85.80, स्नेहल चंद्रकांत फंड 85.60, गायत्री संतोष हराळ 85, साक्षी मारुती वाडेकर 84.40, प्रांजल भाऊसाहेब भोस 83.40, ऋतिका संतोष नवले 83.40, वैष्णवी बजरंग बोरुडे 81 टक्के या प्रथम दहा गुणवंत विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक मुख्याध्यापक व शिक्षकांचा सरपंच संजय निगडे यांचे हस्ते फेटा व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सरपंच संजय निगडे यांनी विद्यार्थ्यांना आपण आपल्या जीवनात काय काय करायचं, कुठे जायचं, कुठे असायचं हे ठरविण्याची पहिली लढाई आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालात या पुढील लढाया यशस्वीपणे जिंकुन आपले, आपल्या आईवडीलांचे, गावाचे व देशाचे नाव उज्वल करा, असे सांगत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपसरपंच राजेंद्र भोस, यात्रा कमिटीचे अध्यक्ष संदिप रोडे यांनी गावाच्या वतीने विद्यालयासाठी लागणारी सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले व विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी श्रीकृष्ण धावडे (उपसरपंच), देविदास भोस (माजी सरपंच), संजय शेळके (सोसायटी चेअरमन), नाना हराळ (सोसायटी संचालक), झुंबर खुरोगे (ग्रामपंचायत सदस्य), रामा गंगाधरे (सोसायटी संचालक), शरद शेळके (प्राथमिक शिक्षक), अनिल शेळके (पोलीस पाटील), हौसराव बोरुडे (माजी सरपंच), हभप आबा नवले, नवनाथ भोस, महेश कन्हेर, निलेश शेळक, दत्ता भोस, अजय शेळके, दगडू शेळके (शिक्षक), बापू भोस, गोरख निगडे, महेश निगडे, विजय क्षीरसागर, बजरंग बोरुडेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 144