निशिता धुत हिचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून सत्कार!


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-11-29
   

अकोला : येथील नामांकित अ‍ॅड. नितीन धुत यांची कन्या निशिता धुत हिला इंटरनॅशनल इंडिया लॉ युनिव्हर्सिटीच्या गोवा येथील राष्ट्रीय महाविद्यालयात विधी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला त्याबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून भावी आयुष्यात वकिली ते न्यायाधिश अशा यशस्वी मार्गावरून भावी प्रवास करणार्‍या निशिताचा सत्कार करण्यात आला. हे विद्यापीठ सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली बार असोसिएशनची निर्मिती असून यातून बाहेर पडणारे विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करणारे ठरतात. 
या महाविद्यालयात देशभरातून 30 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला असून त्यात महाराष्ट्रातून 3 आणि विदर्भातून निशिताचा एकमेव प्रवेश आहे. विशेष सुप्रिम कोर्टाचे प्रमुख न्यायाधिश मा. चंद्रचुड साहेब हे येथे मार्गदर्शक म्हणून राहणार आहेत. 
अकोल्यातून 12 वी तील प्राप्त उच्चांकाच्या यशानंतर या नव्या प्रवेशाच्या संधीबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या 15 व्या मासिक विचारमंथन मेळाव्यामध्ये अभिनंदन करून तिला शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्यात. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक प्रा. डॉ. संतोष हुशे तर प्रमुख अतिथी पुष्पराज गावंडे होते. संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख, अ‍ॅड. नितीन अग्रवाल, अ‍ॅड. नितीन धुत व पदाधिकारी तथा लोकस्वातंत्र्यचे सभासद व निमंत्रितांची यावेळी उपस्थिती होती. 

    Post Views:  358


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व