कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या "सेवा परमो धर्म" या विचाराने स्थापन झालेल्या आधार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा काल जवाहर नगर स्थित श्री गुरुदेव सेवाश्रम येथे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 4 दिवसीय पुण्यतिथी सोहळ्याच्या समारोपीय कार्यक्रमात करण्यात आला. आधार दिनदर्शिकेचे हे 3 रे वर्ष असून परिसरातील उपयोगी माहिती व फाऊंडेशनचे उपक्रम या दिनदर्शिकेच्या माध्यमातून नागरिकांपर्यत पोहोचविण्याचे काम केले जाते. दर वर्षी 3000 दिनदर्शिका मोफत नागरिकांच्या घरपोच दिल्या जातात. या दिनदर्शिकेत सर्व सण -उत्सव, जागतिक दिन, थोर महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी, परिसरातील महत्वाचे संपर्क क्रमांक, परिसरातील नवउद्योजक-व्यावसायिक यांच्या जाहिराती असा संपूर्ण बहुउपयोगी दिनदर्शिका आधार फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रकाशित करण्यात येते. या प्रकाशनाच्या वेळी. श्री गुरुदेव सेवाश्रम चे श्री. भानुदास कराळे, आधार चे मार्गदर्शक ऍड. वंदन कोहाडे, श्री. बंडूभाऊ शेळके, श्री. दिलीप सावरकर आधार चे अध्यक्ष माणिक शेळके, सचिव राहुल ठाकूर, गौरव पांडे, प्रेम लहरिया, केवल ठाकूर, सुमित ठाकरे, सुदर्शन राऊत, सुशील ठाकरे, मंगल इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 180