विठ्ठल माळी यांचा ग्रामीण बँकेत सेवापूर्ती समारंभ


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Oct 2024, 8:59 AM
   

अकोला - विदर्भ कोकण ग्रामीण  बँकेच्या उगवा शाखेचे व्यवस्थापक श्री विठ्ठलराव उत्तमराव माळी हे ४० वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर दि.३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. स्वभावातील विनम्रता आणि बॅंकीग क्षेत्रातून ग्रामीण जनतेला सुलभ सेवा देत कर्तव्य बांधिलकी जोपासणारे एक सामाजिक संवेदनशिल अधिकारी म्हणून ग्राहक आणि समाजामधून त्यांनी आपला परिचय सेवा काळातून सिध्द केला आहे .ते बाळापूर तालूक्यातील वझेगाव येथील रहिवाशी असून  स्व‌.उत्तमराव पाटील या वारकरी संप्रदायी वडील आणि परिवारातील संस्कारातून सेवाभाव जपणारं व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत.
   त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त ग्रामीण  बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  एक भावस्पर्शी निरोप समारंभ घडवून आणला.याप्रसंगी बाळापूरचे माजी आमदार श्री नारायणराव गव्हाणकर  अध्यक्ष म्हणून तर  विदर्भ कोकण बँकेचे क्षेत्रीय अधिकारी  श्री एस.एम.गटकल,ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री अविनाश महाले हे प्रमुख अतिथी  तर   उगवा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री हेमंतलाल पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष आणि अतिथींनी आपल्या मनोगतातून त्यांच्या शिस्तबध्द सेवाकार्याचा याप्रसंगी गौरव केला.
      यावेळी विठ्ठलराव माळी यांनी आपल्या आपल्या मनोगतातून कृतार्थ जीवन प्रवासाचे श्रेय आई वडील परिवार सदस्य ,बॅंकचे ग्राहक, अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक स्नेही मित्रांना दिले. उपस्थित अतिथी, अधिकारी कर्मचारी,ग्राहक तथा गावकऱ्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीपश्चात निरामय आणि आनंदित जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

    Post Views:  360


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व