बोईसर मधील दांडीया स्थळावर वाहनतळ नाही... ध्वनिप्रदुषण आणि अनेक समस्या!
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
13 Oct 2023, 6:58 PM
बोईसर - (संतोष घरत) - बोईसर शहरामध्ये नामांकित असलेले पारसी जर तोडी अंजुमन ट्रस्टचेउ सर्कस मैदानावर १५ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर हया कलावधी मध्ये विश्वास फाउंडेशन तर्फे बोईसर रंग रास २०२३ चे व्यावसायिक दांडिया रास चे आयोजन केले असुन, ह्या स्पर्धेत भाग घेणारे व ह्या स्पर्धेचे मनोरंजन करण्याकरिता येणाऱ्या रसिकांसाठी मोठे वाहन तळ नसल्याने त्या ठिकाणी मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बोईसर रंगरास ने प्रसिद्धीकरिता लावलेल्या बोईसर व आजूबाजूच्या परिसरामध्ये लावलेले लाखो रुपयांचे फळक व कमानी करिता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायत मध्ये कुठल्याही प्रकारे शुल्क न भरल्यामुळे त्यांना फलक (होल्डिंग) लावण्यास परवानगी दिली नसल्याचे ग्रामपंचायत मध्ये चौकशी अंती कळाले. विश्वास फाउंडेशनने स्वतःच्या फायद्या करिता सार्वजनिक विभाग व ग्रामपंचायतीचा लाखोचा महसूल बुडविला आहे. तसेच कमानीवर मोठ मोठ्या नामांकित व्यक्तीकडून जाहिराती करिता पैसे घेऊन त्यांची जाहिरात करण्याकरिता फलक लावलेले आहेत ते फलक प्रसिद्ध करताना विश्वास फाउंडेशनने त्यांच्याकडून मोठया प्रमाणात पैसा गोळा केला असेल हया मध्ये शंका नाही . परंतू संबंधित विभागाकडून फलक व कमानी लावताना तसा परवाना घेणे आवश्यक असताना, स्वतःच्या फायद्या करिता तशा प्रकारची परवानगी न घेता अनधिकृत फलक व कमानी पूर्ण परिसरामध्ये लावलेल्या आहेत.
बोईसर रंग रास कार्यक्रम हा बोईसर- तारापूर मुख्य रस्त्यावर आयोजित केल्यामुळे हया ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होईल. तसेच नवरात्र चालणाऱ्या उत्सवामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होइल . बोईसर रंग रास ह्या कार्यक्रमाच्या लगतच रिलीफ हॉस्पिटल, वरद हॉस्पिटल ,बालाजी हॉस्पिटल तसेच मुदतसर हॉस्पिटल आहेत. हया हॉस्पिटलमध्ये अनेक आजाराने ग्रस्त असे रुग्ण दाखल असतात, नवरात्र चालणाऱ्या उत्सवात ध्वनी प्रदूषणामुळे त्यांच्यावर परिणाम होऊन मोठी घटना घडू शकते. असे जनतेचे म्हणणे आहे.
सदर प्रकरणाची संबंधित विभागाने सखोल चौकशी करून आयोजकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून जोर धरू लागली आहे.
Post Views: 211