पीक कापणी प्रयोगाचा अहवाल अचूक व निर्धारित वेळेत द्या- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश


 sanjay deshmukh  26 Nov 2021, 7:31 PM
   

अकोलादि.26 : रब्बी पीक कापणी प्रयोगाच्या सर्व्हेक्षणकरीता जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गंत कापणी प्रयोगाच्या उत्पन्नाची अचूक आकडेवारी व निर्धारित वेळेत पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी मिळवून अहवाल सादर कराअसे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

पिकांचा उत्पन्न अंदाज काढण्यासाठी पीक कापणी प्रयोग व अंमलबजावणीबाबतच्या कार्यशाळेचे आयोजन नियोजन सभागृहात पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसेउपविभागीय कृषी अधिकारी के.बी. खोतकृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळेकृषी अधिकारी संध्या करवाव्हि.एच.चव्हाणकृषी पर्यवेक्षक एन.बी. राठोडआर.आर. शेळकेपी.आर. घोंगळे  आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले कीकापणी प्रयोगाच्या उत्पन्नाची अचूक आकडेवारी काढण्याकरीता नियोजन करा. पर्यवेक्षीय अधिकारी यांनी पिकांचे व गावांचे वाटप करुन अचूक सर्व्हेक्षण होईल याची दक्षता कृषी अधिकारी यांनी घ्यावी. पिकांची पैसेवारी निश्चित करण्यासाठी तालुका पातळीवर दहा वर्षाची पिकांची सरासरी उत्पन्नाची आकडेवारी घ्या. पीक कापणी प्रयोगाचे नियोजननिहाय 100 टक्के तक्ते पर्यवेक्षण अहवाल वेळेवर तयार करा. याकरीता प्रत्येक तालुक्यामध्ये तहसिलदारपंचायत समितीतालुका कृषी अधिकारी यांनी कार्यालयात रजिष्टर ठेऊन नोंदी ठेवाव्या व दरमासिक सभेचा आढावा घ्यावाअसे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले.

    Post Views:  174


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व