लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचारमंथन मेळाव्यात बिहार राष्ट्रीय अधिवेशनातील सहभागाची माहिती
अकोला--लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अभा स्तरावरील समाजाभिमुख पत्रकार महासंघाचा दर महिण्याचा नियोजित विचारमौथन मेळावा नुकताच संपन्न झाला.यावेळी या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पत्रकार महासंघाचे केन्द्रीय मार्गदर्शक तथा सल्लागार सदस्य व शासनाच्या साहित्त्य व संस्कृती मंडळाचे सदस्य श्री पुष्पराजजी गावंडे होते.

या सभेत सर्वप्रथम ईश्वरचिठ्ठीने काढण्यात आलेल्या बि.सी.ड्रॉ मध्ये केन्द्रीय महासंघाचे मार्गदर्शक सल्ला.सदस्य श्री संतोषजी हूशे हे भाग्यवान विजेते ठरले.यावेळी काढण्यात येणाऱ्या दिनदर्शिकेसाठी आलेल्या जाहिरातींची,त्यासाठी मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची माहिती संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी दिली.तसेच अधिक जाहिराती व देणग्यांच्या स्वरूपातून पत्रकार महासंघाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे व,सभासदवाढ करून संघटनेची ताकद वाढविण्याचे पदाधिकारी तथा सभासदांना आवाहन केले.त्याचप्रमाणे पटना,बिहार येथील साहित्य व संस्कृती मंडळाकडून भरविण्यात येणाऱ्या भव्य राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासंबंधीची चर्चा बिहार येथील पदाधिकाऱ्यांसोबत सुरू असल्याची माहिती यावेळी दिली.या राष्ट्रीय अधिवेशनात २-३ हजार लोकांची व्यवस्था केली जाणार असून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून येणाऱ्या पत्रकार पदाधिकाऱ्यांना वर्तमान गणतंत्र और भविष्यकालीन भारत या विषयावर आपली मतं व्यक्त करण्याकरीता व्यासपीठावर सहभागी करण्यासंबंधीचा प्रस्ताव बिहारी पदाधिकाऱ्यांनी आपल्या पत्रकार महासंघाकडे ठेवल्याची माहिती यावेळी संजय एम.देशमुख यांनी दिली.

यावेळी संघटनवाढीसंबंधी व प्रकाशित होणाऱ्या दिनदर्शिकेच्या महाराष्ट्रभरातील वितरणाचे नियोजन,कॅलेंडर प्रकाशन कार्यक्रम,व संघटनेच्या १२ फेब्रूवारी या वर्धापन दिन कार्यक्रमासंबंधी व ईतर महत्वपूर्ण बाबींवर चर्चा करण्यात आली.आगामी विचारमंथन मेळावा हा २२ जानेवारीला निश्चित करण्यात आला.
साहित्त्यिक चळवळीतील व्यापक योगदानाबध्दल मिळालेल्या युथ आयकॉन पुरस्काराबाबत केन्द्रीय कार्यकारिणी पदाधिकारी पत्रकार संदिप देशमुख यांचा अभिनंदनपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,तर डॉ.योगेश साहू यांना अकोला जिल्हा कार्यकारिणीतील मार्गदर्शक तथा सल्लागार सदस्य म्हणून नियुक्ती पत्र तथा ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
या मेळाव्याला केन्द्रीय पदाधिकारी प्रदिपभाऊ खाडे,राजेन्द्र देशमुख,किशोर मानकर,प्रा.राजाभाऊ देशमुख,डॉ.शंकरराव सांगळे,संतोषभाऊ हूशे, अॕड.नितीनजी अग्रवाल,अशोकुमार पंड्या,अकोला जिल्हाध्यक्ष विवेक मेतकर,नंदकुमारजी चौबे,निशाली पंचगाम,किर्ती मिश्रा,दिपाली बाहेकर,सागर लोडम,मंगेश चऱ्हाटे,रविन्द्र देशमुख,सतिश देशमुख,दिलीप नवले,व ईतर सभासद उपस्थित होते.
Post Views: 280