तारापूर औद्योगिक क्षेत्रात नेत्यांच्या आशीर्वादाने केमिकल माफिया जोमात


भले जनता गेली कोमात, तरी फरक नाही अधिकाऱ्यांना....
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  22 Apr 2023, 6:15 PM
   

बोईसर- (संतोष घरत)- तारापूर औद्योगिक क्षेत्रात घातक रसायन युक्त भरलेला टँकरची  गळती होत असुन ट्रक ड्रायव्हर फरार,MH 04 FP 3533 आणि MH 46 F 6202 अशा गाड्या असून हा घातक द्रव्य संशयित कंपनी इंडस ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनी प्रक्रियेसाठी आल्याअसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


ही घटना प्लॉट नंबर - J-23 मागील बाजूस असून घटनास्थळी फायर ब्रिगेड ची गाडी  दाखल. या घातक द्रव्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील कामगार व जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. रात्री चालणाऱ्या ह्या अवैध धंद्यात मोठमोठ्या नेत्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे रात्री चाललेले काळे धंदे  होऊच शकत नाही . सर्व पक्षीय नेते व नागरिकांनी एकत्र आले तर तारापूर औद्योगिक क्षेत्रात व इतर ठिकाणी होणाऱ्या अवैध धंद्यावर आळा बसू शकतो . तरी  ह्या घातक द्रव्य असलेल्या टँकरवर MPCB चे अधिकारी आणि पोलीस यंत्रणा काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Post Views:  114


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व