मरणोत्तर•• जीवन!! गौरव!! सन्मान!!!•••••••


 संजय देशमुख  2023-02-12
   

•••• समाज बंधुंनो नमस्कार,

अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या वतीने शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी नागपूर येथील श्री लक्ष्मीनारायण सभागृहामध्ये••• नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ!!! आयोजित करण्यात आला आहे• सदर कार्यक्रम प्रथमच विदर्भात होत असल्यामुळे परिषदेने फक्त विदर्भातील 15 कर्तुत्ववान व्यक्तींचाही!!! विशेष सन्मान करण्याचे योजिले आहे•••
समाज बंधुंनो, कार्यक्रम विदर्भात असल्यामुळे परिषदेने फक्त विदर्भातीलच मान्यवर व्यक्तींचा यामध्ये समावेश केला आहे•• 

ज्यावेळी उर्वरित महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम होतील त्यावेळी त्या त्या भागातील मान्यवरांचाही विशेष सन्मान परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे••• विदर्भामध्ये आपल्या समाजातील दिवंगत असलेल्या समाज बांधवांनी आणि भगिनींनी त्या त्या वेळी आपल्या क्षेत्रामध्ये बहुमूल्य योगदान दिले असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल सुद्धा त्या त्या भागातील मान्यवरांनी घेतली होती••• आपल्या समाजातील महिलेला तर महाराष्ट्रातून प्रथम आदर्श शिक्षक हा पुरस्कार प्राप्त झाला होता, तसेच शिक्षक असलेल्या मान्यवर समाज बंधूंना आदर्श शिक्षक हा पुरस्कार प्राप्त झालेला होता•• स्वातंत्र्य मिळण्यासाठी काही आदर्श पुरुषांनी त्याग सुद्धा केला आहे•• काहींनी नगराध्यक्ष पद सुद्धा भूषविले आहे•• स्वातंत्र्यापूर्वी नागपूर सारख्या शहरात येऊन महिलांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे•••
अतिशय उच्च विचारसरणी, साधे राहणीमान, सतत काही ना काही देण्याची वृत्ती, त्यागी भावना, गरीब आणि गरजू मुला, मुलींना, समाज बंधूंना वेळोवेळी मदत, परोपकारी वृत्ती, आपल्या कुटुंबासोबत आपल्या समाजाचाही सर्वांगीण विकास झालाच पाहिजे हा विचार ठेवून जगणारे आपले दिवंगत समाज बंधू यांचा!!!! मरणोत्तर•••• जीवन गौरव सन्मान•••!!! करण्याचे परिषदेने सर्वानुमते ठरविले आहे••• अतिशय कर्तुत्ववान, अभिमान वाटेल अशा व्यक्तींचा विचार समाजासमोर यायला हवा आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांचे विचार अखंडपणे पुढेही सुरूच राहायला हवे हा दृष्टिकोन ठेवून परिषदेने हा निर्णय घेतला आहे•• विदर्भातील ज्या खालील दिवंगत समाज बंधूंना जीवन!! गौरव !!!मरणोत्तर!!! सन्मान दिला जाणार आहे त्यांचे विचार येणाऱ्या पिढीने लक्षात ठेवावे, विचारांचे अनुकरण करावे, समाजासाठी आपले काही कर्तव्य आहे, बांधीलकी आहे हे निदान कायमचे लक्षात ठेवावे हा सामाजिक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्यात आला आहे••• सन्मान हा स्मृतीचिन्ह देऊन केला जाणार आहे •
 अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेस सुद्धा आपल्या समाजातील दिवंगत झालेल्या समाज बंधूंना मरणोत्तर!!! जीवन गौरव सन्मान जाहीर करताना आनंद होत आहे••• ज्यांचा मरणोत्तर गौरव परिषद करणार आहे त्यांचे कार्य शब्दात वर्णन करणे किंवा या व्हाट्सअप च्या माध्यमातून मांडणे शक्य नाही त्यामुळे फक्त थोडक्यात नावासहित सहित माहिती मी देत आहे•••   कार्यक्रमाच्या वेळी जाहीर केलेल्या सर्व दिवंगत मान्यवरांचा सविस्तर परिचय दिला जाईल•••
1) स्वर्गीय सुलोचना बाई बाबुराव जुमळे, यवतमाळ, आपल्या समाजातील तसेच महाराष्ट्रातील पहिल्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त एकमेव आदर्श शिक्षिका••

2) स्वर्गीय वामनराव उर्फ दादासाहेब शंकरराव हाते, मेडशी, राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक• स्वर्गीय नारायणराव देशकर, पवनी, स्वातंत्र्य सेनानी, तसेच सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात योगदान••स्वर्गीय जनार्दन पंत हांडे, नागपूर, कायदेविषयक तज्ञ, समाजातील गरजूंना वेळोवेळी कायदेविषयक मदत आणि उत्कृष्ट समाजसेवक•••• स्वर्गीय नामदेवराव धोपे, अकोला, उत्कृष्ट समाजसेवक, गरिबांना शिक्षणासाठी सर्वांगीण मदत•••
स्वर्गीय यशवंतराव खोडवे, उत्तर वाढवणा, जिल्हा यवतमाळ, उच्चशिक्षित, प्रचंड जनसंपर्क, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे योगदान•••
स्वर्गीय कमलाबाई गणपतराव दाभाडे, वाशिम, अत्यंत हुशार, उच्च विचार, शिक्षणाचा मंत्र सतत देणाऱ्या•••
 स्वर्गीय सखाराम जी परशराम बोटके, वाशिम, विदर्भामध्ये प्रथमच वाशिम या ठिकाणी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करून संपूर्ण विदर्भामध्ये त्यानंतर क्रांती केली••
 विदर्भातील वधू वर परिचय मेळाव्याचे जनक असे म्हटले तरी चालेल•
स्वर्गीय किशोर भाऊ झंजाड, मंगरूळपीर, सामाजिक राजकीय, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान•• मंगरूळपीर शहराचे नगराध्यक्ष पद सुद्धा भूषविले••
वरील सर्व दिवंगत मान्यवरांचे नातेवाईक कार्यक्रमाच्या वेळी सहकुटुंब सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी परिषदेला मनापासून सहकार्य करावे ही नम्र विनंती•••


    Post Views:  220


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व