खामगाव अर्बनचे पुरूषोत्तम मोरखडे यांचा निरोप समारंभ


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Sep 2024, 8:42 AM
   

रामराव देशमुख,जिल्हा प्रतिनिधी
खामगाव - स्थानिक कॉटन मार्केट शाखेतील व्यवस्थापक श्री पुरुषोत्तमजी मोरखडे हे ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त झालेत. ते मुळचे बाळापूर तालूक्यातील निंबा येथील रहिवाशी आहेत‌.या प्रसंगी बँकेतील कर्मचारी संघटना व शाखेतील कर्मचारी वृंद यांचे तर्फे त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास बँकेचे सन्माननीय अध्यक्ष मां प्रा. श्री विजयजी पुंडे,  सरव्यवस्थापक श्री ज्ञानेश्वरजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 
     या प्रसंगी बँकेचे  अध्यक्ष,, सरव्यवस्थापक व शाखाधिकारी यांनी बँकेच्या वतीने त्यांचे शाल, टोपी, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ड्रेस व सौ वहिनीसाहेब यांना सौभाग्य वाण, साडीचोळी देवून गौरविण्यात आले. या प्रसंगी त्यांचे सेवेचा यथोचित गौरव करण्यात येऊन त्यांचे पुढील आयुष्यासाठी  शुभेच्छा देण्यात आल्यात.       या प्रसंगी मुख्य कार्यालयातील व मुख्य शाखेतील अधिकारी,कर्मचारी श्री प्रमोद कस्तुरे,श्री शेखर कुळकर्णी,श्री वैभव देशपांडे,श्री दत्तात्रय कुळकर्णी, श्री राकेश शर्मा, व शाखेतील कर्मचारी वृंद उपस्थित होते.

    Post Views:  37


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व