मुंबई: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. सोमवारी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. वर्षा गायकवाड यांनी काल कोरोना सदृश्य लक्षणं जाणवत होती, त्यानंतर मी स्वत: ला आयसोलेट करुन घेतलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं वर्षा गायकवाड यांनी आवाहन केलं आहे.
कोरोनाची सौम्य लक्षण
वर्षा गायकवाड यांनी कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची माहिती ट्विटवरुन दिली आहे. कोरोनाची लक्षणं सौम्य असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्या प्रकृती व्यवस्थित असून सुरक्षेच्या कारणामुळं आयसोलेट करुन घेतलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
काँग्रेस नेते आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना देखील कोरोना ससंर्ग झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर ते देखील आयसोलेट झाले होते. काल के. सी. पाडवी आणि आज वर्षा गायकवाड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याचं रविवारी समोर आलं होतं. त्यानंतर विधानसभेतील तब्बल 32 जणांना कोरोनाची लागण झाली होती. भाजप आमदार समीर मेघे यांनी फेसबुकवर पोस्ट करत स्वतःला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. त्यांनी स्वतःच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करुन घेण्याचा सल्लाही दिला होता.
Post Views: 304
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay