दहावी व बारावीतील उत्तीर्ण दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार दिव्यांग सोशल फाउंडेशनचा आगळा उपक्रम


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  20 Jun 2022, 12:52 PM
   

अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत. नुकताच वर्ग दहावी व बारावी चा निकाल लागला आहे. या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून घवघवीत यश संपादन केले आहे. शैक्षणिक सत्र २०२२ मध्ये ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्या सर्वांचा सत्कार दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे केला जाणार असून गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. अशा सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी दि.२६ जून २०२२ पर्यंत दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या हेल्पलाइन ०९४२३६५००९० क्रमांकावर नोंदणी करावी. असे आव्हान अरविंद देव, प्रसाद झाडे, अनामिका देशपांडे, अंकुश काळमेघ, किर्ती मिश्रा, स्वाती झुनझुनवाला, भारती शेंडे, सुशांत घुगे, पूजा गुंटीवार व सरोज तिडके यांनी केले आहे.

    Post Views:  144


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व