अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तत्त्वज्ञान घराघरातील ग्राहकापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवायला पाहिजे - नारायणराव मेहरे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  20 Dec 2024, 11:32 AM
   

अकोला -     अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत ची कार्यकारणी बैठक रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 ला सकाळी 9 ते ४.३० वाजेपर्यंत चार सञात अकोला येथे भाऊसाहेब लहाने सभागृहात विदर्भ प्रांताध्यक्ष डॉक्टर नारायणराव मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रांत संघटक मंत्री श्री डॉक्टर अजय गाडे, प्रांत सचिव नितीन  काकडे , बैठकीचे आयोजक अकोला जिल्हा अध्यक्ष मनजीत देशमुख जिल्हा संघटन मंत्री दिनेश जी पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व विदर्भातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
       सभेच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे व्यासपीठावरील पाहुण्यांनी पूजन करून बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नगीन दास बैरागी यांच्या सोबत पदाधिकारी यांनी खरा तो एकची धर्म  गीताने सुरुवात झाली .ग्राहक पंचायत चे तत्त्वज्ञान हे दुधासारखे आहे दूध घरोघरी जाऊन विकावे लागते तर दारूचे दुकान लोक स्वतः च शोधतात. ग्राहक म्हणजे खूप मोठा विषय आहे. ग्राहक पंचायत चे चांगले तत्त्वज्ञान घराघरातील ग्राहकापर्यंत  कार्यकर्त्यांनी पोचवायला पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी घरोघरी जावं लागते.दूध ,दही विकावे लागते कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंत ग्राहक पंचायत शिस्तीत चालते, गुणवत्तेशी तडजोड नाही.
      विदर्भ प्रांत संघटन मंत्री डॉक्टर अजय जी गाडे यांनी वस्तूवरील एम.आर.पी, सायबर बाबत तज्ञ मार्गदर्शकांना बोलवून ग्राहकांना प्रबोधन करणे गरजेचे आहे.       92 वर्षीय भीष्म पितामह सुधाकरराव जकाते यांनी सेवेत असणारे किंवा साठीच्या आतली कार्यकर्ते पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत म्हणून सेवानिवृत्त झालेल्या सेवाभावी होतकरू व्यक्तींना सामील केले तर ते जीव ओतून कामे करतील. प्रांत सचिव नितीनजी काकडे यांनी यवतमाळ येथे झालेल्या सभेचे इतिवृत्त वाचून 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत "ग्राहक पंधरवडा" प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आयोजित करून वेगवेगळे उपक्रम राबवावे असे सांगितले तसेच 4 जानेवारीला यवतमाळ येथे केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती होणाऱ्या बैठकीला विदर्भातील प्रत्येक जिल्हा च्या किमान तीन प्रतिनिधींनी हजर राहावे. तसेच ग्राहक  पंधरवाड्यात घेतलेल्या उपक्रमाचा अहवाल जिल्हा सचिवाने न चुकता पाठवावा. सर्व पदाधिकाऱ्यांनी सुधाकरराव जकाते काका यांच्या मार्गदर्शनात सुरुवातीपासून अकोला जिल्हा अग्रस्थानावर आहे असे आवर्जून सांगितले. संघटन मंत्री दिनेश पांडे यांनी मोबाईलवर अनवांटेड कॉल घेऊ नये Truecaller ॲप डाऊनलोड करावे असे सांगितले ,श्री यादवडकर यांनी गॅस बाबत माहिती दिली. पेट्रोल पंपावर न मिळणाऱ्या सुविधा बाबत स्व.बोधनकर साहेब, मनजीत देशमुख,दिनेश‌  पांडे शरद यादवडर , प्रमोद बोरकर आदींनी अकोला जिल्ह्यातील पेट्रोल‌ पंपाला भेटी देऊन त्यांना सुविधा देण्याचे भाग पाडले. तोच उपक्रम प्रांत सचिव यांनी विदर्भ भर राबवण्यासाठी सर्वांना आवाहन केले.
अकोला जिल्हाध्यक्ष मनजीत देशमुख यांनी अकोला जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमाची माहिती देऊन ग्राहक पंधरवडा अनेक उपक्रम राबवण्याबद्दल सांगितले. बुलढाणा, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांनी जिल्हा निहाय अहवाल सादर करून राबवीत असलेले उपक्रम व पुढील ग्राहक पंधरवडा मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे प्रांताध्यक्षांना सांगितले. अमरावतीचे चारुदत्त चौधरी यांनी टॅग अँड बॅग च्या मार्फत पर्यावरण रक्षण करण्यासंदर्भात प्रॅक्टिकली माहिती दिली. सभेला उपस्थित जिल्हाध्यक्ष नगीनदास बैरागी, अशोक हांडे, अनिल मिस्ञा, डॉक्टर संजय धोत्रे,पी.एम कावठकर आदींनी बैठकीत आपले मत व समस्या मांडल्या.
      दिवसभर चाललेल्या बैठकीच्या चौथ्या सञात नारायणराव मेहरे यांनी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करून ४ यवतमाळ येथे होणाऱ्या जानेवारीला केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सर्व जिल्ह्याच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी हजर राहण्याचे आव्हान केले तसेच ग्राहक पंधरवड्यात विविध उपक्रम राबविण्यात यावे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, अकोला जिल्हाध्यक्ष मनजीत देशमुख,सह दिनेश पांडे, प्रमोद बोरकर, विजय बाहाकर,शरद यादवडकर, देशपांडे ,अमूतलाल यादवआदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला विजय खरात,, राकेश चोपडा, अनमोल ढोरे, अंकुश तिवलकर ज्ञानेश्वर टाले, आनंद महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.अकोला जिल्ह्याच्या ने बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांना चहा, काॅफी, नाश्ता व सुरूची भोजन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांत सचिव नितीन काकडे यांनी केले. 
सूत्रसंचालन संघटन मंत्री दिनेश जी पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय बाहाकर यांनी केले.

    Post Views:  17


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व