नवी दिल्ली : येत्या दीड वर्षात तब्बल 10 लाख जणांना रोजगार दिला जाणार आहे. तसे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहे. वेगवेगळ्या मंत्रालयांना आणि विभागांना संबंधित विभागांमध्ये पदभरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या दीड वर्षामध्ये दहा लाख लोकांची पदभरती करण्याचं ध्येय केंद्र सरकारकडून ठेवण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभागांमध्ये काम करणाऱ्यांच्या संख्याबळाचा आढावा घेतला. त्यानंतर सर्वच खात्यातील मंत्रालयांना आणि विभागांना पदभरती करण्याबाबतच्या सूचना दिल्यात. पीएमओ इंडियाकडून ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारमधील नोकरभरती कधी सुरु होणार, याकडे बेरोजगारांचे आणि इच्छुकांचे डोळे लागले होते. अखेर आता लवकरच पदभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचं स्पष्ट झालं.
Post Views: 247
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay